छ. संभाजीनगरात ३ भीषण अपघात : कंटेनर-एसटी बस अपघातात वाळूजजवळ ८ प्रवासी जखमी, पैठणमध्ये पिकअप झाडाला धडकून २५ जखमी, वैजापूरमध्ये कारने दुचाकीस्वाराचा घेतला बळी!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कंटेनर व एसटी बस यांच्यात अपघात होऊन चालकासह बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर- पुणे महामार्गावरील वाळूजजवळील इसारवाडी फाट्यावर बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी ७ वाजता घडली.

बसचालक अनिल सुभाष वाकचौरे (वय ३८, रा. संगमनेर), सायली वल्ली (वय २४, रा. अहिल्यादेवीनगर), मनोहर गव्हाणे (वय ३१, रा. शेवगाव), राज गिरी (वय २२, रा. हिंगोली), संदीप सुधाकर दहिभाते (वय ३८, रा. अमरावती), गीता विजयकांत गायकवाड (वय ५३), पूजा असणारे (वय २२), प्रशांत संजय जाधव (वय २५, तिघेही रा. छत्रपती संभाजीनगर) यांचा जखमींत समावेश आहे. त्‍यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंगापूर आगाराची एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ३०४२) छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जात होती. इसारवाडी फाटा येथे नगरकडून शेंदूरवादा, बिडकीनकडे वळण घेणाऱ्या कंटेनरची समोरून बसला जोरदार धडक झाली. एसटी बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. वाळूज पोलिसांनी घटनास्थळी येऊन क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद वाळूज पोलिसांनी घेतली आहे.

पिकअप वाहन झाडाला धडकले, २५ मजूर जखमी
पैठण तालुक्‍यातील आडूळ- कडेठाण मार्गावरील आडूळ खुर्द शिवारात बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास चालकाचा ताबा सुटून मजुरांना घेऊन जात असलेले भरधाव पिकअप वाहन एका झाडाला धडकले. यात २५ मजूर जखमी झाले. सर्व मजूर पैठण तालुक्यातील अब्दुल्लापूर तांडाचे रहिवासी आहेत. अब्दुल्लापूर तांडा व्यापारी ३० मजुरांना घेऊन एकतुनी येथे मोसंबी तोडण्यासाठी आडूळमार्गे पिकअप वाहनातून (क्र. एमएच २०-ईएल ३३८४) नेत होता. आडुळ खुर्द शिवारातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या बाजूच्या नालीमध्ये पिकअप वाहन आदळून कडेला लिंबाच्या झाडावर धडकले.

ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले. जखमी मजुरांत अभय तुळशीराम चव्हाण (वय १९), अमर तुळशीराम चव्हाण (वय १७), रेखा बाबासाहेब चव्हाण (वय २८), पारूबाई ज्ञानेश्वर राठोड (वय २६), सुनीता विनायक राठोड (वय २९), इंदूबाई संजय राठोड (वय ३५), उषा सुनील राठोड (वय ३३), कोमल सुदाम चव्हाण (वय १८), सुरेखा रणजीत राठोड (वय ३०), सुनीता सुनील चव्हाण (वय २६), उषा लहू राठोड (वय ३०), सुदाम श्रीचंद चव्हाण (वय ३८), आरती अर्जुन चव्हाण (वय १७), विशाखा लहू राठोड (१४), सुरेश गबरू चव्हाण (वय ४०), नीता दुर्गादास जाधव (वय ३०), छबाबाई नान्हू चव्हाण (वय ३६), रुखमणबाई गबरू राठोड (वय ५५), शांताबाई युवराज जाधव (वय ४४), गोकुळ बाबासाहेब राठोड (वय १९), राधाबाई रणजीत राठोड (वय ३५, सर्व रा. अब्दुल्लापूर तांडा) यांचा समावेश आहे.

वैजापूरमध्ये कारने उडवल्याने दुचाकीस्वाराचा मृत्‍यू
वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील चोर वाघलगाव शिवारात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार रामेश्वर कारभारी गोरे (वय २६, रा. टाकळीसागज, ता. वैजापूर) याचा जागीच मृत्‍यू झाला. हा अपघात बुधवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. रामेश्वर महालगाव येथून दुचाकीने घरी टाकळीसागज येथे जात होता. चोर वाघलगाव शिवारात समोरून भरधाव कारने त्याला उडवले. रामेश्वर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्‍याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्‍तांना भेटले

Latest News

स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्‍याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्‍तांना भेटले स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्‍याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्‍तांना भेटले
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : करोडी टोलनाक्‍यावर तक्रार करण्यासाठी रजिस्टर मागितल्यावर नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या ३ प्रमुख मनसैनिकांना बेदम चोपले. त्‍यामुळे...
छ. संभाजीनगरात महसूल सप्ताहाचा समारोप; स्वतःचे ज्ञान अद्ययावत करून  लोकांना सेवा द्या : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Feature : *जीवनातील रहस्ये कळतात जिभेवरून*
गुगल हॅकर्सच्या निशाण्यावर!; अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरीला गेला, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...
श्रीमंत-गरीब भेद करणाऱ्या पाडापाडीविरुद्ध छ. संभाजीनगरात मोठा मोर्चा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software