विभागीय क्रीडा संकुल २१ कोटी घोटाळा : बँक अधिकाऱ्यासह दोन लिपिकांना अटक, आणखी ५ कोटींच्या रकमेचा हिशेब लागेना!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विभागीय क्रीडा संकुलाच्या २१ कोटी ५९ लाख रुपयांच्या घोटाळ्यात आणखी तिघे संशयित समोर आले असून, त्‍यांना आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (११ जानेवारी) अटक केली. यात क्रीडा विभागाचा पूर्णवेळ वरिष्ठ लिपिक स्वप्निल त्र्यंबक तांगडे (वय ३३, रा. प्रथमेशनगरी, सातारा परिसर), इंडियन बँकेचा तत्कालीन सहव्यवस्थापक सचिन रमेश वाघमारे (वय ३७, रा. संसारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विभागीय क्रीडा संकुलाच्या २१ कोटी ५९ लाख रुपयांच्या घोटाळ्यात आणखी तिघे संशयित समोर आले असून, त्‍यांना आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (११ जानेवारी) अटक केली. यात क्रीडा विभागाचा पूर्णवेळ वरिष्ठ लिपिक स्वप्निल त्र्यंबक तांगडे (वय ३३, रा. प्रथमेशनगरी, सातारा परिसर), इंडियन बँकेचा तत्कालीन सहव्यवस्थापक सचिन रमेश वाघमारे (वय ३७, रा. संसारी नाका, देवळाली, नाशिक) आणि बँकेचा लिपिक नितीन नारायण लाखोले (वय ३६, रा. भवानीनगर, जुना मोंढा) यांचा समावेश आहे. कामात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करून घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्‍यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्‍यांना न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्‍यान, पोलीस कोठडीत असलेला घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २१, मूळ रा. अंबड, जि. जालना ह. मु. बीड बायपास) याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्‍याचीही पोलीस कोठडीची मुदत १४ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. सरकारी वकील समीर बेदरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडताना हर्षकुमारकडे अजूनही पाच कोटींचा तपास बाकी असल्याचे न्यायालयाला सांगत वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती.

नियम डावलून नेटबँकिंगला परवानगी…
सचिन वाघमारे, नितीन लाखोले यांनी नियम डावलून हर्षकुमारला नेट बँकिंगला परवानगी कशी दिली? हर्षकुमार व सचिन, नितीन आणि स्वप्नील तांगडे यांच्यात पैशांचा व्यवहार झालाय का? याबाबत तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने मांडले. त्यानंतर न्यायालयाने चौघांनाही १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मोठी संस्था, शासकीय विभागात विभागप्रमुखांकडून आर्थिक व्यवहार, बँकेच्या नियमित कामकाजासाठी ठरावीक व्यक्ती प्राधिकृत केली जाते. तसे पत्र संबंधित खात्यांना दिले जाते. हर्षकुमारबाबत असे कुठलेच पत्र नव्हते. तरीही कोट्यवधींचे व्यवहार, कॅश बुक नोंदी हर्षकुमार करीत होता. विभाग व बँकेने त्यावर आक्षेप नोंदवला नाही. त्‍यामुळे या घोटाळ्यात आणखी बरेच जण सहभागी असण्याची शक्यता वाढली आहे.

कोणाची काय चूक…
-लेखा विभागाचे कॅशबुक लिहिणे, व्यवहारांच्या नोंदी, बँकेचे व्यवहार, आयडी पासवर्डची जबाबदारी या गोष्टी लेखी सूचनांनुसार वरिष्ठ लिपिक स्वप्निल तांगडेकडे असायला हव्यात. मात्र त्‍याने हर्षकुमारकडे ती जबाबदारी दिली. शिवाय, हर्षकुमार करत असलेल्या कामाची कधी फेरपडताळणीही स्वप्निलने केली नाही.
-नितीन लाखोले याने तर कहरच केला, जेव्हा त्‍याला हर्षकुमारचा ई- बँकिंगसाठी ई-मेल आला. तेव्हा दोनदा त्‍याने मेल बनावट व अनधिकृत असल्याने नकार दिला. तिसऱ्या वेळेस मात्र परवानगी देत वरिष्ठांकडे पाठवला.
-ई-बँकिंगचा प्रस्ताव नितीनकडून सचिनकडे गेला. ई-बँकिंगसाठी प्रत्यक्षात फॉर्म भरून घेणे, प्राधिकृत व्यक्‍तीची परवानगी, संपर्क करून खातरजमा करणे आवश्यक होते. सचिनने याकडे दुर्लक्ष केल्याने हर्षकुमारचे फावले.

आरोपीच्या वकिलांकडून असा केला बचाव…
सचिन वाघमारे व नितीन लाखोले यांच्यावतीने बचाव करताना ॲड. प्रशांत निकम यांनी न्यायालयात सांगितले, की क्रीडा उपसंचालक सबनीस यांचे पत्र असल्याने, त्‍यावर त्‍यांची सही होती. त्‍यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा दोष नाही. बँक कर्मचाऱ्यांना हर्षकुमारने प्रत्‍यक्ष लाभ दिल्याचा एकही पुरावा नाही. सबनीस यांची फसवणूक झालेली आहे, मग त्‍यांनी का तक्रार दिली नाही, असा युक्‍तीवाद त्‍यांनी केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software