वाळूज MIDC तील औरंगाबाद ॲटो ॲलनसरी प्रा. लि. कंपनीत विद्यार्थ्याच्या जिवाशी खेळ!; ना माहिती दिली, ना जवळ थांबले, थेट मशिनवर बसवले, दोन बोटे छाटली गेली!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयटीआयने प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला वाळूज एमआयडीसीतील औरंगाबाद ॲटो ॲलनसरी प्रा. लि. कंपनीच्या मॅनेजर, सुपरवायझरने थेट मिलिंग मशिनवर कामाला बसवले. त्‍याच्या वयाचा विचार केला नाही, की त्‍याला माहितीही दिली नाही. त्‍यामुळे मशिनमध्ये विद्यार्थ्याची दोन बोटे छाटली गेली असून, त्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंपनीच्या मॅनेजर, सुपरवायझरविरुद्ध […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयटीआयने प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला वाळूज एमआयडीसीतील औरंगाबाद ॲटो ॲलनसरी प्रा. लि. कंपनीच्या मॅनेजर, सुपरवायझरने थेट मिलिंग मशिनवर कामाला बसवले. त्‍याच्या वयाचा विचार केला नाही, की त्‍याला माहितीही दिली नाही. त्‍यामुळे मशिनमध्ये विद्यार्थ्याची दोन बोटे छाटली गेली असून, त्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंपनीच्या मॅनेजर, सुपरवायझरविरुद्ध गुन्हा मंगळवारी (१ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.

प्रणय महावीर चिपोले (वय १८, रा. जुना मोंढा रोहिदासपुरा बालाजी मंदिरासमोर छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, तो कुटुंबासह राहतो. रेल्वे स्टेशन रोडवरील औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) शिकतो. त्‍याचे वडील कुशन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता त्याला आयटीआयने औरंगाबाद ॲटो ॲलनसरी प्रा. लि. प्लॉट नं. H-27MIDC वाळूज या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून ट्रेनिंगसाठी पाठविले होते. तेव्हा त्या कंपनीचे मॅनेजर दत्ता जोशी व सुपरवायझर गणेश (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी प्रणयच्या वयाचा विचार न करता व त्याला कोणतेही प्रशिक्षण न देता सरळ मोठ्या मिलिंग मशिनवर कामासाठी बसविले. मशिन चालविण्याची कुठलीही माहिती दिली नाही, की त्याच्याजवळ थांबलेही नाही. त्‍यामुळे सकाळी १० वाजता मिलिंग मशिनवर प्रणयच्या डाव्या हाताच्या पंजाची मधली दोन बोटे तुटून गंभीर दुखापत झाली. अधिक तपास पोलीस अंमलदार एकनाथ गिरी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software