वाळूज सिडको महानगर १ कमानीजवळ ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन महागड्या कारचे मोठे नुकसान, ३ महिला जखमी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील सिडको महानगर १ च्या कमानीजवळ ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. टेम्‍पोने मागून अर्टिगा कारला धडक दिली. अर्टिका कार समोरच्या इनोव्हाला धडकली. यात अर्टिगा आणि इनोव्हा दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. अर्टिगा कारमधील ३ महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी (८ जून) सकाळी साडेअकराला घडली. बाबासाहेब विश्वनाथ बनसोडे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील सिडको महानगर १ च्या कमानीजवळ ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. टेम्‍पोने मागून अर्टिगा कारला धडक दिली. अर्टिका कार समोरच्या इनोव्हाला धडकली. यात अर्टिगा आणि इनोव्हा दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. अर्टिगा कारमधील ३ महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी (८ जून) सकाळी साडेअकराला घडली.

बाबासाहेब विश्वनाथ बनसोडे (वय ५५, रा. बौध्दनगर, पिंपरी चिंचवड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. रविवारी बनसोडे हे कुटुंबासह अर्टिगा कारने (MH 14 JA 1437) रामनगर, जालना येथे लग्नानिमित्त जात होते. कार त्यांचे बंधू संतोष विश्वनाथ बनसोडे चालवत होते. कारमध्ये आशाबाई विष्णू साळवे, सरला संतोष बनसोडे, कल्पना बाबासाहेब बनसोडे, वेणूबाई अंबादास बनसोडे असे एकूण ६ जण होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास सिडको महानगर-१ कमानीजवळ ओअॅसीस चौक ते एएस क्लब चौक या रोडवरून जात असताना रोडवर एक स्कुटरवाला पडल्याने वाहतूक थांबली होती. त्यामुळे बनसोडे यांनीही कार थांबवली. त्याचवेळी मागून एक टेम्पो (MH 20 AA 7391) भरधाव येऊन कारला जोरात धडक दिली. त्यामुळे कारची मागील काच पूर्ण फुटली व गाडीची डिक्की चेपून नुकसान झाले.

कारला टेम्पोने धडक दिल्याने समोर असलेल्या इनोव्हा कारवर (MH 20 FP 8786) बनसोडे यांची कार जाऊन आदळली. त्यामुळे बनसोडे यांच्या कारचे समोरचे बोनेट व इंजिनचे नुकसान झाले. इनोव्हा कारचेही मागून पूर्ण चेपून नुकसान झाले. अर्टिगा कारमधील आशाबाई साळवे, सरला बनसोडे, कल्पना बाबासाहेब बनसोडे, वेणूबाई अंबादास बनसोडे यांना मार लागल्याने जखमी झाल्या. कारला धडक दिल्यानंतर टेम्पोचा चालक टेम्पो रोडच्या बाजूला उभा करून पळून गेला. टेम्पोमध्ये दहा ते पंधरा लोक बसलेले होते. तेथे जमलेल्या लोकांकडून टेम्पोचालकाचे नाव अशपाक हबीब शेख (वय २८,रा. अजवानगर, वाळूज, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असल्याचे समोर आले. बनसोडे यांनी ११२ हेल्पलाइनला कॉल केल्याने पोलीस धावून आले. त्यांनी अपघातग्रस्त सर्व वाहने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. जखमी महिलांना वाळूज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. टेम्‍पोचालक अशपाक शेखविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software