- Marathi News
- सिटी क्राईम
- भुमरेंचा चालक जावेदवर ९ तास प्रश्नांचा भडीमार, पण चौकशीत सहकार्य करेना!; १५० कोटींच्या जमिनीचे गौडबं...
भुमरेंचा चालक जावेदवर ९ तास प्रश्नांचा भडीमार, पण चौकशीत सहकार्य करेना!; १५० कोटींच्या जमिनीचे गौडबंगाल
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांना हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिली आहे. परभणीच्या ॲड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, सोमवारी (३० जून) त्याची तब्बल ९ तास कसून चौकशी करण्यात […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांना हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिली आहे. परभणीच्या ॲड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, सोमवारी (३० जून) त्याची तब्बल ९ तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र त्याने जमिनीसंदर्भात कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत, की चौकशीला सहकार्यसुद्धा केले नाही. तो वकिलासह पोलीस आयुक्तालयात हजर झाला होता.
सालारजंगचे वंशज मीर महेमूद अली खान यांनी भुमरेंकडून मोठी रक्कम घेऊन चालक जावेदच्या नावे १५० कोटींच्या जमिनीचा बनावट हिब्बानामा (दानपत्र) करून दिल्याचा आरोप अॅड. मुजाहीद खान यांनी केला आहे. काल्डा कॉर्नर येथील ही ३ एकर जमीन असून, अॅड. मुजाहिद इकबाल खान समीरउल्ला खान (रा. परभणी) यांच्या नावे आधी ९० लाख ते एक कोटी रुपयांच्या व्यवहारात जमिनीचे ॲग्रिमेंट टू सेल, नोंदणीकृत मुखत्यारनामा व हिब्बानामा करून दिला होता, असा दावा ॲड. खान यांचा आहे. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ॲड. खान यांचे म्हणणे आहे की खासदाराच्या ड्रायव्हरचा सालार जंग यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही, मग ते मौल्यवान मालमत्ता का देतील? ड्रायव्हर जावेद १३ वर्षांपासून भुमरे पिता-पुत्रांची गाडी चालवत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 16:53:00
प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, प्रदोष व्रत...