- Marathi News
- सिटी क्राईम
- फुलंब्री पोलिसांचा चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर सर्जिकल स्टाइक!; छत्रपती संभाज...
फुलंब्री पोलिसांचा चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर सर्जिकल स्टाइक!; छत्रपती संभाजीनगर शहरातील १८ प्रतिष्ठित जुगारी पकडले, महिंद्रा एक्सयूव्हीसह ७ वाहनांसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती शहरात गुन्हे शाखेने जुगार अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात केल्याने आता शहरातील प्रतिष्ठित जुगारी शहराच्या आसपासच्या भागात जमू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरापासून अगदी जवळ आणि चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शामवाडीत फुलंब्री पोलिसांनी फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अक्षरशः सर्जिकल स्टाइक केला. १८ प्रतिष्ठित जुगारी पकडले असून, […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती शहरात गुन्हे शाखेने जुगार अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात केल्याने आता शहरातील प्रतिष्ठित जुगारी शहराच्या आसपासच्या भागात जमू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरापासून अगदी जवळ आणि चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शामवाडीत फुलंब्री पोलिसांनी फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अक्षरशः सर्जिकल स्टाइक केला. १८ प्रतिष्ठित जुगारी पकडले असून, त्यांच्याकडून मोठी रोकड जप्त करण्यात आली. फार्महाऊस मालकासह १९ जणांविरुद्ध सोमवारी (२३ जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (२२ जून) रात्री सव्वादहाच्या सुमारास करण्यात आली.
पूजा नांगरे यांच्या कार्यालयातील दोन पोलीस अंमलदार दसरे व चंदिले, वडोदबाजार येथील पोलीस अंमलदार सपकाळ, बागल, मैंद, चिकलठाणा येथील पोलीस उपनिरीक्षक धुळे, महिला पोलीस अंमलदार बनसोड, फुलंब्री येथील सहायक पोलीस निरीक्षक वडते, पोलीस उपनिरीक्षक चाटे, सहायक फौजदार काळे, पोलीस अंमलदार कनसे, शिंदे, राठोड, रोहे, महिला पोलीस अंमलदार गाडे, पांढरे असा पोलिसांचा मोठा फौजफाटा कारवाईसाठी शामवाडीत रात्री सव्वा दहाला धडकला.
फार्महाऊसचे गेट लावलेले होते. त्यामुळे पोलिसांनी गेट व भिंतीवरून उड्या मारून आत प्रवेश केला. फार्म हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला असता तेथे काही व्यक्ती समोरच्या हॉलमध्ये गोलाकार बसून तिर्रट जुगार खेळत होते. पोलिसांना पाहून त्यांची पळापळ सुरू झाली. मात्र पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी त्यांना जागीच थांबण्यास सांगून पोलिसांचा व पंचांचा परिचय करून दिला. त्यानंतर जुगार खेळणाऱ्यांची नावे विचारण्यात आली व अंगझडती घेण्यात आली.
सर्व जुगारी शहरातले…
रतन पुरणमल चव्हाण (वय ३९, रा. गल्ली नं. १० पुंडलिकनगर), सय्यद अजीम सय्यद असीफ (वय ४२, रा. मिसारवाडी), आवेज खान युनूस खान (वय ३१, रा. बुड्डीलाईन कबाडीपुरा), शेख वाहेद शेख अफसर (वय ४०, रेहमानिया कॉलनी मौलाना आझाद चौक), इलीयास हमीद खान (वय ३१, रा. गल्ली नं.२६ नारेगाव नॅशनलनगर), तौफीर अमेर बक्श (वय २७, रा. सब्जीमंडी रोड पैठणगेट), शेख शाहीद शेख मेराज (वय ३५, रा. गल्ली नं. २ हर्सूल, जहाँगीर कॉलनी), युसूफ खान मेहबूब खान (वय ५७, रा. श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी एन ८ सिडको), अब्दुल सलाम फारूख खान (वय ३९, रा. गल्ली नं.२१ बायजीपुरा), बबलू कमरुद्दीन सय्यद (वय ४२, रा. कृष्णनगर मिसारवाडी), मोहम्मद तनवीर शेख (वय २८, रा. अजिज कॉलनी नारेगाव), तौफीक फईम शेख (वय २८, रा. पटेलनगर नारेगाव), हसन अब्बास शाहीद हुसेन (वय २९, रा. बुड्डीलाईन), शेख मोहीम शेख सलीम (वय २९, रा. अजिज कॉलनी), शकील जफ्फर सय्यद (वय ४३, रा. साठेनगर हमुमान मंदिराजवळ वाळूज), शेख तोफीक शेख हमीद (वय ३८, रा. गल्ली नं.५ रेहमानिया कॉलनी), शेख मुसा शेख नवाब (वय ३४, रा. कैसर कॉलनी जिन्सी पोस्टेजवळ), शेख जब्बार शेख सत्तार (वय २८, रा. गल्ली नं.२६ नारेगाव नॅशनल पार्क) हे छत्रपती संभाजीनगर शहरातून आलेले जुगारी पकडण्यात आले. त्यांच्यासह फार्महाऊस मालक शब्बीर पटेलविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महागड्या चारचाकीसह १५ लाख ९६ हजार ४०० रुपयांचामुद्देमाल जप्त
सर्व जुगाऱ्यांच्या अंगझडतीत एकूण २ जाख ६१ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय फार्महाऊसच्या कुंपनात महिंद्रा एक्सयूव्ही ५०० कंपनीची चारचाकीसह ३ स्कुटी, ३ मोटारसायकल अशी एकूण १३ लाख ३५ हजार रुपयांची वाहने मिळून आली. ती जप्त करण्यात आली आहेत. कारवाईचे ठिकाण महालपिंपरी गटातील असल्याचे निष्पन्न झाल्याने हे घटनास्थळ चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे समोर आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करत आहेत.