धूत कॉम्पेक कंपनीत सुपरवायझरची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगरची घटना, चिठ्ठीत दडलंय काय?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडवरील फारोळाजवळील धूत कॉम्पेक कंपनीत सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) पहाटे पाचच्या सुमारास घडली. देविदास गणपतराव किडे (वय ५४, रा. मानसपुरी, जि. नांदेड, ह मु. अयोध्यानगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. देविदास किडे यांची शुक्रवारी रात्रपाळी होती. क्वालिटी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडवरील फारोळाजवळील धूत कॉम्पेक कंपनीत सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) पहाटे पाचच्या सुमारास घडली. देविदास गणपतराव किडे (वय ५४, रा. मानसपुरी, जि. नांदेड, ह मु. अयोध्यानगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे.

देविदास किडे यांची शुक्रवारी रात्रपाळी होती. क्वालिटी कंट्रोलचे कर्मचारी शनिवारी पहाटे किडे यांची सही घेण्यासाठी गेले असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन किडे यांना बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता मात्रे यांनी तपासून किडे यांना मृत घोषित केले. पंचनामा करत असताना किडे यांच्या खिशात चिठ्ठी मिळून आली. मात्र या चिठ्ठीबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. बिडकीन पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. या चिठ्ठीत दडलंय काय, याबद्दल उत्‍सुकता निर्माण झाली आहे. कदाचित त्‍यातच किडे यांनी आत्‍महत्‍या करण्याचे कारणही लिहिलेले असू शकते, अशी चर्चा घटनास्‍थळी होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

Latest News

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या! धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software