दिवटापूत्र… घर नावावर करून देण्याच्या हट्टाने पेटला, उपकार विसरला, उपाशीपोटी आई-वडिलांना घरातून दिले हाकलून!; भानुदासनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घर एकट्याच्या नावावर करून देण्याच्या हट्टाने पेटलेल्या मोठ्या मुलाने आई-वडिलांचा इतका छळ मांडला की, त्‍यांनीच आपल्याला जन्म देऊन लहानाचे मोठे केले, हेही तो विसरून गेला… उपाशीपोटी त्‍याने आई-वडिलांना घरातून हाकलून दिले. अखेर मातेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात या दिवट्या पुत्राविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी ज्ञानेश्वर भाऊसाहेब कुमावत (रा. गल्ली नं. ६, भानुदासनगर, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घर एकट्याच्या नावावर करून देण्याच्या हट्टाने पेटलेल्या मोठ्या मुलाने आई-वडिलांचा इतका छळ मांडला की, त्‍यांनीच आपल्याला जन्म देऊन लहानाचे मोठे केले, हेही तो विसरून गेला… उपाशीपोटी त्‍याने आई-वडिलांना घरातून हाकलून दिले. अखेर मातेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात या दिवट्या पुत्राविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी ज्ञानेश्वर भाऊसाहेब कुमावत (रा. गल्ली नं. ६, भानुदासनगर, जवाहर कॉलनी) याच्याविरुद्ध शुक्रवारी (१९ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.

सुमनबाई भाऊसाहेब कुमावत (वय ७०, रा. गल्ली नं. ६, भानुदासनगर, जवाहरनगर कॉलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार त्‍या पती भाऊसाहेब कुमावत, मोठा मुलगा ज्ञानेश्वर, मधला मुलगा संतोष यांच्यासह राहतात. लहान मुलगा शरद हा टीव्ही सेंटर येथे त्याच्या कुटुंबासह राहतो. मोठा मुलगा ज्ञानेश्वर हा राहत्या घरात खालील मजल्यावर गॅरेज चालवतो. म्हातारपणात आधार होईल म्हणून सुमनबाई व भाऊसाहेब यांनी राहते घर तिन्ही मुलांच्या नावावर करून दिले आहे.

तिन्ही मुलांच्या नावावर घर करून दिल्याने मोठा मुलगा ज्ञानेश्वर त्यांना वारंवार त्रास देतो. सर्व घर माझ्या एकट्याच्या नावावर करून दे, असे म्हणून आई-वडिलांना धमकी देतो. तो दारू पिण्याच्या सवयीचा असून आई- वडिलांचे पालनपोषण व्यवस्थित करत नसल्याने त्‍यांनी त्याच्या एकट्याच्या नावावर घर केले नाही. यामुळे तो आई-वडिलांना मारण्यासाठी अंगावर धावून येतो. घरातून हाकलून लावण्याची धमकी देतो. आई-वडील आजारी पडले तर कधीही डॉक्टरकडेदेखील घेऊन जात नाही. सुमनबाई व भाऊसाहेब अनेकदा उपाशीपोटी घराबाहेर राहिले आहेत.

१९ जुलैला काय घडलं?
शुक्रवारी (१९ जुलै) दुपारी तीनला ज्ञानेश्वर दारू पिऊन आला. सुमनबाईंना म्हणाला, की सगळे घर माझ्या नावावर कर. नाहीतर घरातून निघून जा… असे म्हणून तो मोठ-मोठ्या आवाजात शिवीगाळ करू लागला. सुमनबाईंनी त्याला घर नावावर करून देण्यास नकार दिला. त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तू घरात कशी राहते तेच बघतो, अशी धमकी दिली व उपाशीपोटी घराबाहेर हाकलून दिले. त्‍यामुळे सुमनबाईंनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software