त्रिमूर्ती चौकातील अंधारात करणार होते ‘कांड’; पोलिसांनी डिक्की उघडली अन्‌ धक्काच बसला !

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्रिमूर्ती चौकातील गल्लीत अंधारात मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दोन तरुणांना पाठलाग करून गस्तीवरील पोलिसांनी पकडले. त्‍यांच्याकडील विनानंबरच्या स्‍कुटीच्या डिक्‍कीत धारदार कोयता, हातोडा आणि अंगझडतीत चाकू, मोबाइल मिळून आले. ही कारवाई गुरुवारी (३ जुलै) रात्री उशिरा करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे, पोलीस अंमलदार शोन पवार, मनोज उईके, मारोती गोरे हे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्रिमूर्ती चौकातील गल्लीत अंधारात मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दोन तरुणांना पाठलाग करून गस्तीवरील पोलिसांनी पकडले. त्‍यांच्याकडील विनानंबरच्या स्‍कुटीच्या डिक्‍कीत धारदार कोयता, हातोडा आणि अंगझडतीत चाकू, मोबाइल मिळून आले. ही कारवाई गुरुवारी (३ जुलै) रात्री उशिरा करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे, पोलीस अंमलदार शोन पवार, मनोज उईके, मारोती गोरे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथील गल्लीत अंधारात दोन तरुण विना नंबरच्या स्कुटीवर थांबलेले दिसले. पोलिसांनी त्‍यांच्याकडे धाव घेतली असता ते स्कुटी चालू करून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून काही अंतरावरच पकडले. विनानंबरच्या स्कुटीबाबत व पळण्याचे कारण विचारले. त्यावर दोन्ही तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्‍यामुळे पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत शेख फैजल शेख मोहमद (वय २८, रा. शहाबाजार), असद बेग हातंम बेग (वय २४, रा. संजयनगर बायजीपुरा) अशी दोघांची नावे समोर आली. अंधारात थांबणे व त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यांची पोलिसांनी अंगझडती घेतली.

त्यांच्या खिशात आयफोन-१६ प्रो, आयफोन-एस व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल मिळून आला. शेख फैजलच्या कमरेला धारदार चाकू मिळाला. स्कुटीच्या डिक्की तपासली असता त्‍यातही धारदार लोखंडी कोयता, लोखंडी हातोडी, स्क्रू ड्रायवर मिळून आला. एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना देण्यात आली. त्‍यांच्या आदेशाने संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आज, ४ जुलैला त्‍यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे, पोलीस अंमलदार पवार, मनोज उईके, मारोती गोरे यांनी पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार

Latest News

मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्‍यातील लासूरस्टेशन येथील ३१ वर्षीय विवाहितेने शिल्लेगाव पोलीस ठाण्यात धक्कादायक तक्रार केली आहे. मॅरिड असूनही...
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software