घाटीत आग; परिचारिका-डॉक्‍टरांच्‍या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऑक्सिजन सिस्टिमच्या अलार्म पॅनलला अचानक आग लागली. परिचारिकेने क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन उपकरणाद्वारे आग नियंत्रणात आणली. त्यानंतर धूर बाहेर पडण्यासाठी सिझेरियन करणाऱ्या डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरच्या काचा फोडल्या. परिचारिका आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ही खळबळजनक घटना शनिवारी (११ जानेवारी) दुपारी छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागाच्या ऑपरेशन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऑक्सिजन सिस्टिमच्या अलार्म पॅनलला अचानक आग लागली. परिचारिकेने क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन उपकरणाद्वारे आग नियंत्रणात आणली. त्यानंतर धूर बाहेर पडण्यासाठी सिझेरियन करणाऱ्या डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरच्या काचा फोडल्या. परिचारिका आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ही खळबळजनक घटना शनिवारी (११ जानेवारी) दुपारी छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सिझेरियन प्रसूती सुरू असताना घडली.

शस्त्रक्रियागृहात ऑक्सिजनचा पुरवठा कमी किंवा जादा झाल्याचे समजण्यासाठी अलार्म पॅनल असून, याच पॅनलला आग लागली. परिचारिका ज्योती मेहत्रे यांच्या ही बाब लक्षात आली. त्‍यांनी लगेचच अग्निशमन उपकरण घेऊन आग नियंत्रण आणणे सुरू केले. त्‍यांना ब्रदर जयराम काशिद, कर्मचारी अब्दुल खमर यांनी मदत करत आणखी दोन बंबांच्या मदतीने आग विझवली. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. एम. बी. लिंगायत, डॉ. प्रभा खैरे यांनी तातडीने घटनास्‍थळी येऊन पाहणी केली.

ही घटना घडत असताना दोन सिझेरियन प्रसूती आणि एकीची गर्भपिशवीची शस्त्रक्रिया सुरू होती. डॉ. वर्षा देशमुख या ऑपरेशन थिएटरमध्ये होत्या. आगीमुळे सगळीकडे धूर झाल्याने धूर बाहेर काढण्यासाठी डॉ. देशमुख यांनी ऑपरेशन थिएटरच्या काचा फोडल्या. ऑक्सिजनचे प्रेशर वाढल्याने आग लागल्याचे समोर येत आहे. ऑक्सिजनच्या लाइनला काहीही झालेले नसून, १५ दिवसांपूर्वीच ऑक्सिजनच्या लाइनचे ऑडिट केले, असे पत्रकारांशी बोलताना डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software