- Marathi News
- सिटी क्राईम
- आयुष्यभर सांभाळतो म्हणे, २ वर्षे शारीरिक संबंध ठेवून आता पलटला…; महिलेची पोलिसांत धाव!, छत्रपती संभा...
आयुष्यभर सांभाळतो म्हणे, २ वर्षे शारीरिक संबंध ठेवून आता पलटला…; महिलेची पोलिसांत धाव!, छत्रपती संभाजीनगरची धक्कादायक घटना
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयुष्यभर सांभाळण्याचे, लग्नाचे आमिष दाखवून त्याने दोन वर्षे तिच्यासोबत पत्नीसारखे शारीरिक संबंध ठेवले. मात्र मन भरल्याने आता तो पलटला. त्यामुळे महिलेने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत आज, ७ सप्टेंबरला समोर आली आहे. अमरजीत धर्मराज […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयुष्यभर सांभाळण्याचे, लग्नाचे आमिष दाखवून त्याने दोन वर्षे तिच्यासोबत पत्नीसारखे शारीरिक संबंध ठेवले. मात्र मन भरल्याने आता तो पलटला. त्यामुळे महिलेने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत आज, ७ सप्टेंबरला समोर आली आहे.
वाळूज एमआयडीसीतील ३९ वर्षीय महिलेने पवन खंदारे (वय २७, रा. रांजणगाव शेणपुंजी) यांच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार केली आहे. ती कुटुंबासह वाळूजला राहते. तिचे पती एका कंपनीत काम करतात. दोन महिन्यांपासून पवन तिचा पाठलाग करत आहे. गुरुवारी (५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता ती घरी दोन मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना पवन आला. महिलेचा हात धरून मी तुझ्यावर प्रेम करतो, जर तू माझी झाली नाही तर मी तुझ्या घरी येऊन मरतो, अशी धमकी दिली. यावेळी त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य करत शिवीगाळ करून चापटाने मारहाण केली. तू माझ्यासोबत आली नाही तर तुला जीवे मारून टाकीन, तुझ्यावर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशा धमक्या देत घरातील साहित्याची नासधूसही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पवनविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्रेमाला नकार देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून धमकावण्यात आल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. दयानंद अशोक शेलार (रा. सिडको वाळूज महानगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (५ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता वाळूजवरून शहरात महाविद्यालयात येण्यासाठी बसने तरुणी निघाली होती. दयानंदने मित्रासह तिचा दुचाकीने पाठलाग केला. ती औरंगपुऱ्यात आल्यावर रस्त्यात अडवून छेड काढली. माझ्यासोबत न बोलल्यास इतरांकडून पाठलाग सुरू करेल, अशी धमकीही त्याने दिली. तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 19:19:25
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...