उद्योजक-पोलिसांत विशेष चर्चा : उद्योगांना सुरक्षित वातावरण द्या; उद्योजकांची पोलिसांना आर्त हाक,  PI गाडे यांनी ‘मसिआ’ला केले आश्वस्त, म्हणाले, आम्ही सदैव तत्पर!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीत सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, चोऱ्या, लुटमारी, वाहतुकीची समस्या ते रात्रीपाळीतील कामगारांची सुरक्षा... अशा सर्व मुद्द्यांवर उद्योजकांनी पोलिसांना साकडे घातले. ‘मसिआ’ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड म्हणाले, की औद्योगिक क्षेत्र हे केवळ उत्पादनाचे केंद्र नसून, हजारो कामगार व उद्योजकांच्या उपजीविकेचे आधारस्थान आहे. त्‍यामुळे तातडीने उपाययोजना करा, अशी विनंती त्‍यांनी केली. त्‍यावर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी त्‍यांना आश्वस्त करत आम्‍ही सदैव तत्‍पर असल्याचे सांगितले.

WhatsApp Image 2025-08-21 at 9.29.55 PM

‘मसिआ’च्या वतीने पोलीस प्रशासनासोबत विशेष बैठक आज, २० ऑगस्टला घेण्यात आली. या वेळी उद्योजकांनी सुरक्षा या एकमेव मुद्द्यावर पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील म्‍हणाले, की कोणताही गुन्हेगारी प्रकार घडल्यास घाबरू नका. त्वरित ११२ वर कॉल करा. सीसीटीव्ही बसवा. कामगारांना नियुक्त करताना कागदपत्रांची पडताळणी करा, अशी सूचना त्‍यांनी केली.

वर्गणी जबरदस्तीने मागितली तर कळवा, गुन्हे दाखल करू...
उत्‍सवासाठी वर्गणी मागणाऱ्यांच्या जाचाबद्दल पोलीस निरीक्षक गाडे म्हणाले, की कोणी जबरदस्ती, दमदाटी करून वर्गणी मागितल्यास त्वरित कळवा. त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल करू. बैठकीला मसिआचे अध्यक्ष  अर्जुन गायकवाड, माजी अध्यक्ष अनिल पाटील व चेतन राऊत, उपाध्यक्ष राहुल मोगले व मनिष अग्रवाल, सचिव सचिन गायके, कोषाध्यक्ष सर्जेराव साळुंके, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि उद्योजक उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software