छत्रपती संभाजीनगरची सर्व शासकीय कार्यालये नववर्षाचा करणार ‘हा’ संकल्प!, जिल्हाधिकारी म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट) : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपापल्या कार्यालयामार्फत येत्या नववर्षापासून लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संपर्क करावा. जिल्ह्यात उद्योग, कृषी आणि पायाभूत सुविधा विकासासह विकासकामे राबवली जात आहेत. सर्व विभागांच्या अधिनस्त जिल्हा व तालुकास्तरीय कार्यालमांनी समन्वय साधून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यालय प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा, ॲग्रीस्टॅक नोंदणी, त्याचप्रमाणे फार्मर आयडी आणि नुकसान भरपाई प्रक्रिया यासाठी विविध विभागांचा समन्वय आवश्यक आहे. या सर्व विभागांनी समन्वय साधून वेळेत काम करणे अपेक्षित आहे. औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पात उद्योग, महसूल, पोलीस व विविध कार्यालयांचा समन्वय आवश्यक आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन किंवा दोनापेक्षा अधिक विभागांचा सहभाग असतो. या शिवाय प्रत्येक शासकीय कार्यालयात कर्मचारी अधिकारी यांनी वेळेत येणे, कार्यालयीन शिस्त पाळणे, कामाची कालमर्यादा पाळणे, वेळेत तक्रारीचा निपटारा करणे याबाबींवरही सर्वांनी लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी खर्च करण्याचे नियोजन करावे. मंजूर झालेला निधी समर्पित करावा लागणार नाही याची खबरदारी प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

Latest News

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या! धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software