अज्ञात वाहनाच्या धडकेने भोळसर व्यक्तीचा मृत्यू, झाल्टा फाट्याजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भोळसर स्वभावाच्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने उडवून दिले आणि वाहन पसार झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहराजवळील झाल्टा फाट्याकडे जाणारे रोडजवळील अंबिका पेट्रोल पंपाशेजारी सोमवारी (२४ नोव्‍हेंबर) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. शरद साहेबराव सुरासे (वय ५३, रा. झाल्टा ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुरुवारी (२७ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

रोहित दीपक सुरासे (वय २८, रा. झाल्टा ह. मु. साईबाबा मंदिराशेजारी रामनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे.  ते आई-वडील, आजी, भाऊ, भावजय यांच्यासह राहतात. त्यांचे काका शरद साहेबराव सुरासे यांना पत्नी, मुले बाळ नसून, ते रोहित यांच्याच कुटुंबासोबत राहत होते. मानसिक आजारी असल्याने भोळसर स्वभावाचे होते. सोमवारी (२४ नोव्‍हेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास शरद सुरासे हे घरातून बाहेर पडले. सायंकाळी सव्वा सहाला झाल्टा फाट्याकडे जाणारे रोडजवळील अंबिका पेट्रोल पंपाशेजारी त्यांना कोणत्या तरी वाहनाने उडवले. ही बाब कळताच रोहित त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन घटनास्‍थळी गेले. जमलेल्या लोकांनी सांगितले, की शरद सुरासे यांना उपचारासाठी ऑटोरिक्षात घेऊन चिकलठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात नेले आहे. रोहित व सर्व नातेवाइक लगेचच रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी शरद सुरासे यांना मृत घोषित केले होते. अधिक तपास पोलीस अंमलदार विक्रम जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार

Latest News

लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून, तिला प्रेग्नंट करून नंतर...
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, भाजपच्या अंतिम खेळीकडे लागल्या सर्वांच्या नजरा!
प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...
वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software