टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला रात्री घडली. या घटनेची तक्रार घेऊन टँकरमालक संतोष पांडुरंग साबळे (वय ३८, रा. अष्टविनायकनगर, रांजणगाव शेणपुंजी) हे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले असता, तक्रार घेण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तब्बल ८ दिवस लावल्याने पोलिसांच्या कामाची ही न्यारी तऱ्हा चर्चेचे कारण ठरली आहे.

संतोष साबळे यांचा टँकरने पाणीपुरवठ्याचा व्यवसाय आहे. ते भावाच्या नावावर असलेले ट्रॅक्टर (क्र. एमएच ३७, एल ९३५३) चालवतात. ट्रॅक्टर आणि त्याली जोडलेले टँकर साबळे यांनी वृंदावन पार्कमधील विनोद धुरट यांच्या बांधकामाच्या ठिकाणी उभे केलेले होते. चोरांनी ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना समोर आली. साबळे यांनी पोलिसांत धाव घेतली असता शोध घेऊ, असे सांगण्यात आले. मात्र लगेच तक्रार घेऊन गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाच नाही. अखेर या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा केल्याने ८ डिसेंबरला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या कार्यपद्धतीची चर्चा सुरू झाली असून, तक्रार घेण्यास का टाळाटाळ केली गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

Latest News

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या! धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software