ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर/पैठण/वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्यासोबतच गरवारे कंपनीतही नोकरी करणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने छत्रपती संभाजीगर शहराजवळील चौका घाटात शुक्रवारी (६ मार्च) दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश राजेंद्र सोमवंशी (मूळ रा. लातूर, ह. मु. शिवनेरी कॉलनी, विजयनगरजवळ, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

महेश विवाहित आहे. त्याने चौका घाटात येऊन झाडाला गळफास घेतल्याचे शुक्रवारी दुपारी अडीचला समोर आले. नागरिकांनी फुलंब्री पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महेशने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचे आई-वडील लातूरला राहतात.

पैठण : परप्रांतीय मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
पैठण तालुक्यातील लिंबगाव ते ढोरकीन रस्त्याच्या कामावर असलेल्या परप्रांतीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रांजणगाव दांडगा शिवारात शुक्रवारी (६ मार्च) सकाळी आठला समोर आली. माहीत पाल रामगोपाल पाल (वय २८, रा. रामपूर, ग्राम फराना, ता. भरतपूर, जि. सिंधी, मध्यप्रदेश) असे या मजुराचे नाव आहे. तो रांजणगाव दांडगा शिवारात मुक्कामाला होता. जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता. गुरुवारी रात्री उशिरा त्याने राहत्या ठिकाणाशेजारील उंबराच्या झाडाला गळफास घेतला. शुक्रवारी सकाळी आठला प्रकार त्याच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

वैजापूर : कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील कृष्णराव कारभारी ठुबे (६०) या शेतकऱ्याचे सततची नापिकी, बँकेच्या कर्जाच्या विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (५ मार्च) रात्री घडली. कृष्णराव ठुबे यांच्याकडे ३ ते ४ एकर शेती असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. गुरुवारी रात्री त्यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता त्यांचा मुलगा सुनील ठुबे हा विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी शेतात गेला असता, त्याला वडील फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्याने ग्रामस्थांच्या मदतीने वडिलांना खाली उतरवून शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software