८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ८० वर्षीय महिलेवर ५४ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील एका गावात समोर आली आहे. वृद्धा घरात रात्री एकटी होती, संशयिताने घरात घुसून बळजबरी केली. शुक्रवारी (६ मार्च) याप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर सायंकाळी सहाला लगेचच सोयगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली. शेख रमजान शेख महमूद (वय ५४) असे त्याचे नाव आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, वृद्धा गुरुवारी (५ मार्च) रात्री घरात एकटीच झोपलेली होती. शेख रमजानने हीच संधी साधली. शुक्रवारी सकाळी नऊला हा प्रकार समोर आला. वृद्धेच्या नातीने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील न्याय सहायता वैज्ञानिक प्रयोगशाळा पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software