- News
- मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी
मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते. शहर पाणी योजनेची काय चालढकल सुरू आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यात आता याही उन्हाळ्यात पाणीटंचाई चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. जलकुंभांवरून विविध वसाहतींकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर १ हजारांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असून, ते खंडित करण्याची कारवाई आता सुरू केली जाणार आहे. या कारवाईमुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे.
पैठण येथील जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभाग महापालिकेकडून दरमहा बिल वसूल करतो. मात्र, महापालिकेने बिल वेळेत न भरल्याने तब्बल ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे आता जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनीही महापालिकेला नोटीस बजावून १५ मार्चपर्यंत एकरकमी ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपये भरा अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या नोटिसीला देऊन दोन दिवस उलटून गेले तरी, महापालिकेकडून काय पाणीपट्टी भरण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 10:15:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....

