ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू दाखवत मोबाइलचा पासवर्ड विचारू लागला. ट्रॅव्हल व्यावसायिकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने चक्क त्यांच्या गळ्याला चाकू लावला. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या दोन तरुणांनी आरडाओरड ऐकून तिथे धाव घेतली आणि टवाळखोराला पकडून ठेवले. नंतर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. ही धक्कादायक घटना रविवारी (१५ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास सिडको बसस्थानकाजवळील अक्षयदीप प्लाझामध्ये घडली.

आर्यन सुनिल दाने (वय १९, रा. जयभवानीनगर मुकुंदवाडी) असे पकडण्यात आलेल्या टवाळखोराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख सलमान शेख सलीम (वय २६, रा. सिध्दार्थ नगर टीव्ही सेंटर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे अक्षयदीप प्लाझा सिडको बसस्थानकाजवळ ट्रॅव्हल्सचे ऑफीस आहे. रविवारी (१५ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास सलमान हे ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये होते. ट्रॅव्हल्सचे तिकीट काढण्यासाठी गंगाराम सुखदेव परते (वय २७, रा. नितीन डेकोरेशन गोडाऊन केम्ब्रीज चौक, चिकलठाणा, मूळ रा. मध्यप्रदेश) आला होता. त्याचवेळी तिथे टवाळखोर आर्यन आला. त्याने गंगारामचा १० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावला. चाकूचा धाक दाखवून मोबाइलचा पासवर्ड विचारू लागला. सलमान यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट सलमान यांच्या गळ्याला चाकू लावला व जीवे मारण्याची धमकी दिली. आरडाओरड ऐकून रस्त्याने जाणारे दोन तरुण ऑफीसमध्ये धावले. त्यांनी चपळाईने आर्यनच्या हातातून चाकू हिसकावला. नंतर त्याला ऑफीसमध्ये ढकलून शटर बंद केले. लगेचच पोलिसांना कॉल करून कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आर्यनला ताब्यात घेतले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना

Latest News

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू...
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software