हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नदीपात्रात पाणी सोडले. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे पाण्याच्या लोंढ्यात एका शेतकऱ्यासह गाय वाहून गेली. दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१७ मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. भानुदास गंगाधर मगर (वय ७२, रा. करंजगाव) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा मुलगा व दोन बैल सुदैवाने बचावले.

शेतकरी भानुदास मगर हे मुलगा राहुल (वय २४), बैलगाडी आणि एका गायीसह शेतातून घराकडे परतत होते. नदीपात्र ओलांडत असतानाच अचानक बोर दहेगाव धरणातून सोडलेल्या पाण्याचा मोठा लोंढा आला. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता, की बैलगाडी, बैल आणि गायीसह पिता-पूत्र वाहून जाऊ लागले. राहुल आणि गाडीला जोडलेले दोन बैल कसेबसे बाहेर पडले आणि वाचले. भानुदास मगर आणि गाय मात्र वाहून गेली. ग्रामस्थांच्या शोधमोहिमेत रात्री ८ च्या सुमारास भानुदास मगर यांचा मृतदेह समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली आढळला. मगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

उपअभियंत्याचा फोन बंद
पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यापूर्वी दवंडी देणे आवश्यक होते. मात्र त्यात हलगर्जीपणा केल्याने शेतकऱ्याचा आणि गायीचा बळी गेला. दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मगर यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बोर दहेगाव मध्यम प्रकल्पाचे उप अभियंता पवन चव्हाण यांना कॉल केले असता त्यांचा फोन बंद होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना

Latest News

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू...
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software