हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत घराबाहेर हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेने छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी (१२ मार्च) पती, सासू-सासरे, नणंद, दीर अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

२५ वर्षीय विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती सध्या माहेरी हर्सूलमध्ये राहते. तक्रारीनुसार, तिचे लग्न १३ जून २०२४ रोजी फुलंब्री तालुक्यातील तरुणासोबत झाले होते. लग्नानंतर ती, पती, सासू, सासरे, दीर, नणंद एकत्र राहत होते. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने पती व सासरच्यांनी तिला चांगले नांदविले. नंतर ३० डिसेंबर २०२४ पासून त्यांनी ‘लग्नात तुझ्या आई- वडिलांनी आमच्या मागणीप्रमाणे सोन्याचे दागिने व संसारोपयोगी सामान, चारचाकी गाडी दिली नाही.’ असे म्हणून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. तिचा पती पुण्यात  नोकरी व डॉक्टरचा व्यवसाय करत होता.

१ जानेवारी २०२५ रोजी पतीने तिला त्याच्या नोकरीच्या ठिकाणी पुण्यात नेले. तेथे फ्लॅट भाड्याने घेऊन ते राहत होते. सासू, सासरे, दीर, नणंद हे त्यांच्याकडे पुण्याला येत होते. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी  सासू, सासरे, नणंद, दीर हे पुण्याला आले. ते विवाहितेला म्हणाले, की तुझ्या आई-वडिलांकडून मोठे हॉस्पिटल टाकण्यासाठी व चारचाकी गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये... त्यावर विवाहितेने असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे सर्वांनी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तेव्हापासून ती माहेरी हर्सूलमध्ये राहत आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार निर्मला कोलते करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software