- Marathi News
- स्पेशल इंटरव्ह्यू
- Special Interview : दिल्ली मेट्रोत मी अनेकदा विनयभंगाची शिकार; रात्री मुलांनी माझा पाठलाग केला!; अभि...
Special Interview : दिल्ली मेट्रोत मी अनेकदा विनयभंगाची शिकार; रात्री मुलांनी माझा पाठलाग केला!; अभिनेत्री झोया हुसैनचा धक्कादायक खुलासा

“मुक्काबाज’ या लोकप्रिय चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री झोया हुसैन हिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. तिच्या माघ : द विंटर विदीन या चित्रपटाचे चित्रपट महोत्सवांमध्ये खूप कौतुक होत आहे. नुकतीच ती मनोज बाजपेयीसोबत भैयाजीमध्ये दिसली होती. तिच्याशी खास बातचित… दिल्लीत वाढलेल्या झोयाला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. ती सांगते, की लहानपणापासूनच मला शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांची खूप […]
“मुक्काबाज’ या लोकप्रिय चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री झोया हुसैन हिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. तिच्या माघ : द विंटर विदीन या चित्रपटाचे चित्रपट महोत्सवांमध्ये खूप कौतुक होत आहे. नुकतीच ती मनोज बाजपेयीसोबत भैयाजीमध्ये दिसली होती. तिच्याशी खास बातचित…
दिल्लीहून मुंबईत स्थलांतरित झालेली झोया मुंबईला दिल्लीपेक्षा अधिक सुरक्षित शहर मानते. ती म्हणते, की दिल्लीत माझा अनेकदा विनयभंग झाला आहे. माझे कॉलेज धौला कुआनमध्ये होते. छेडछाड, वाईट इशारे करण्याच्या अनेक घटना माझ्यासोबत घडल्या आहेत. दिल्लीत जर तुम्ही संध्याकाळी घराबाहेर पडलात तर भीती आणि अस्वस्थतेची भावना नेहमीच तुमच्याभोवती असते. दिल्ली मेट्रोमध्ये मी अनेकदा विनयभंगाची बळी ठरली आहे. तिथे हे सामान्य आहे. मुंबईत तुम्हाला कोणी छेडले तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. पण दिल्लीत असे होत नाही. जर कोणी तुमची छेड काढत असेल किंवा तुमच्या अगदी जवळ असेल तर कोणी काही बोलत नाही. मी गुडगावला राहते.
चित्रपट चालला नाही तर वाईट वाटते…
मुक्काबाजमध्ये विनीत कुमारसोबत काम केलेली झोया नुकतीच मनोज बाजपेयीसोबत भैयाजीमध्ये दिसली होती. ती म्हणते, की मी विनीतकडून खूप काही शिकले. मनोज बाजपेयी यांच्याबद्दल सांगायचे तर, दोघांचेही कामाबद्दल सारखेच समर्पण आहे. मनोजजींसोबत काम करणं खूप छान होतं. भैय्याजी हा त्यांचा शंभरावा चित्रपट. सुरुवातीला मी खूप घाबरले होतो, पण मनोज जी आणि त्यांची पत्नी शबानाजी यांनी माझी खूप काळजी घेतली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही हे मला मान्य आहे. चित्रपट बनवताना प्रत्येक विभाग आपले सर्वोत्तम योगदान देतो, पण चित्रपटाला तेवढाच प्रतिसाद का मिळाला नाही याचे काही विश्लेषण मी करू शकत नाही, पण हो चित्रपट चांगला चालला नाही तर वाईट वाटते, असेही झोया म्हणाली.
बाहेरच्या लोकांना जास्त नकार सहन करावा लागतो…
नकाराच्या प्रक्रियेबद्दल ती म्हणते, मला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला आहे. हे बाहेरच्या लोकांसोबत खूप घडते. अनेकवेळा तुम्ही एखाद्या भूमिकेसाठी तीन-चार महिने देता, पण तुमची निवड झाली की नाही हे सांगितले जात नाही. त्यामुळे त्रास होतो. मग तुम्ही कुठेतरी वाचले की तुम्ही ज्या भूमिकेसाठी खूप मेहनत करत होता ती भूमिका दुसऱ्याने घेतली आहे. सुरुवातीला जेव्हा माझ्यासोबत असे घडले तेव्हा मला खूप वाईट वाटायचे, असे झोया म्हणाली. आगामी प्रोजेक्ट्सबद्दल ती म्हणते, मी दोन-तीन चांगल्या प्रोजेक्ट्सची वाट पाहत आहे. मी दिबाकर बॅनर्जीसोबत एक चित्रपट करत आहे. एक OTT चित्रपट देखील आहे. मी आमिर बशीरसोबतही एक चांगला चित्रपट केला आहे, जो काश्मीरवर आधारित आहे. माघ : द विंटर विदिन असे या चित्रपटाचे नाव आहे. माझी भूमिका खूप भावनिक आणि ताकदीची आहे. गेल्या वर्षी बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्याचा प्रीमियर झाला आणि तिथे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. आम्ही मित्रांनी मिळून हा चित्रपट बनवला आहे.