छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार रिक्षाची तोडफोड, बॅनर फाडले, उमेदवाराच्या भावाला जातिवाचक शिवीगाळ!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार वर्षा जाधव यांच्या प्रचाराच्या रिक्षावर तिघांनी हल्ला करत तोडफोड केली. बॅनर फाडून टाकले. वर्षा यांच्या भावावर धारदार शस्‍त्राने हल्ला करून जखमी केले. जातिवाचक शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी (६ जानेवारी) दुपारी साडेचारला प्रभाग क्र. ५ मध्ये घडली.

मिथुन रतन जाधव (वय ३५, रा. घाटी रोड, जेतवन बौद्धविहारामागे, जयभीमनगर) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते रिक्षाचालक असून, त्यांची बहीण वर्षा रतन जाधव (वय २८, रा. जेतवन बौद्धविहार मागे, जयभीमनगर) या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ५ मधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत. वर्षा यांचा प्रचार मिथून हे स्वतःच्या रिक्षाने कायदेशीर परवानगी घेऊन करत आहेत. मंगळवारी मिथून जाधव, किशोर काशीनाथ वाघ हे रिक्षावर भोंगा, पार्टीचे ध्वज,  बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर व उमेदवार वर्षा जाधव यांचे फोटो असलेला बॅनर लावून दुपारी साडेचारला गरम पाणी, प्रकाशनगर, सिद्धार्थ गार्डन जलतरणमागच्या गल्लीत प्रचार करत होते.

तेथे मोटारसायकलीवर अरबाज करीम खान हा दोन व्यक्तींसोबत बसलेला होता. "आज के बाद इस मोहल्ले में आना नही’, असे म्हणून अरबाजने जातिवाचक शिवीगाळ केली. तिघांनी मिळून जाधव यांच्या रिक्षावर लावलेले बॅनर धारदार शस्त्राने फाडले. अरबाजच्या सोबतच्या गुड्डू नावच्या व्यक्तीनेही जाधव यांना यानंतर या भागात यायचे नाही. नाहीतर जीवे मारून टाकू, असे धमकावले. जाधव आणि त्यांच्यासोबतच्या वाघ यांना हाताचापटाने मारहाण केली. जाधव यांच्या ओठावर धारदार वस्तूने मारून जखमी केले. यावेळी लोक जमले होते. त्यांच्याकडून कळले, की अरबाजसोबत अन्सार अन्सारी उर्फ निप्पल व अब्दुल समीर उर्फ गुड्डु (सर्व रा. गरमपाणी) होते. जाधव यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्‍त सागर देशमुख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software