- News
- पॉलिटिक्स
- म्हणून मंत्री सावेंकडून मुख्यमंत्र्यांनी उधार घेतले २० रुपये, म्हणाले... कमळ बेदाम...चिखलात राहूनही....
म्हणून मंत्री सावेंकडून मुख्यमंत्र्यांनी उधार घेतले २० रुपये, म्हणाले... कमळ बेदाम...चिखलात राहूनही... ; क्रांती चौकात कमल तलावाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत करून महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. हे योगदान अमुल्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कमल तलावाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: तिकिटाची खरेदी करून कमल तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, की कमळाच्या ठिकाणी कितीही चिखल, दलदल असो पण कमल फुल ते कधीही एक छिटाही अंगावर येऊ देत नाही. कमळावर कुठलाही दाग लागत नाही. अशा या कमल फुलाच्या तलावाचे येथे पुनरुज्जीवन केलेले असून, त्याचे पहिले तिकीट आपण स्वतः २० रुपये उधार घेऊन खरेदी केले आहे. हे २० रुपये आपले मंत्रिमंडळातील सहकारी अतुल सावे यांच्याकडून उधार घेतलेले असून, आज आपण कमल तलाव पाहायला जाऊ शकलो नाही तरी आपली मनपा आयुक्तांना विशेष विनंती असेल की, जेव्हा पुन्हा कधी शहरात येऊ त्यावेळी जुने तिकिट अधिकृत समजून आपणास तलाव बघण्यासाठी प्रवेश द्यावा, असे फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. अतुलजी तुमच्याकडून २० रुपये उधार घेतले आहेत, पण पुढच्या काळात परत करेन, असा विश्वास देतो. तोपर्यंत तिकीट ठेवून देतो, असे फडणवीस म्हणाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 06:57:00
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...

