- Marathi News
- पॉलिटिक्स
- मला लाज वाटते... म्हणत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांती चौक दणाणून सोडला!, काँग्रेसची शहागंजमध्य...
मला लाज वाटते... म्हणत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांती चौक दणाणून सोडला!, काँग्रेसची शहागंजमध्ये निदर्शने
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरले असून, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाने सोमवारी (११ ऑगस्ट) क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन केले. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दीड तास आंदोलन चालले.
.jpg)
काँग्रेसची शहागंजमध्ये निदर्शने
निवडणुकीत मत चोरीचा आरोप करत विरोधी पक्षांच्या ३०० खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत सोमवारी (११ ऑगस्ट) मोर्चा काढला. मोर्चा पोलिसांनी अडवून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. त्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेले. तिथून त्यांना २ तासांनंतर सोडण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसतर्फे रास्ता रोको व निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे आंदोलन जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वात करण्यात आले. गांधी भवनात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद स्क्रीनवर दाखविण्यात आली. या वेळी जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, सूर्यकांत गरड, विनोद तांबे, इक्बालसिंग गिल, अनिस पटेल, अतिश पितळे, उमाकांत खोतकर, शेख कैसर बाबा, राहुल सावंत, डॉ. नीलेश आंबेवाडीकर, विशाल बन्सवाल आदींचा सहभाग होता.