सुभाष पाटील आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उपनेते!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख, मग पक्षातून बाहेर, पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर स्वतःचा पक्ष असं मोठा प्रवास करणारे सुभाष पाटील यांची आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी (१८ ऑक्टोबर) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे ही घोषणा करण्यात आली..

शिवसेना एकसंध आणि ऐन भरात असताना पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे पहिले जिल्हाप्रमुख म्हणून पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात पक्षाने मोठी झेप घेतली होती. नंतर चंद्रकांत खैरे, मोरेश्वर सावे, प्रदीप जयस्वाल हे नेते मोठे झाल्यानंतर पाटील यांचा पक्षातील प्रभाव कमी होऊ लागला होता. पक्ष मोठ्या निवडणुकीत तिकीटापासून वंचित ठेवत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. काही काळ शांत राहिल्यानंतर पाटील यांनी राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये प्रवेश केला. मात्र ते तेथे फार काळ रमले नाहीत.

त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये देखील स्वतःला आजमावून पाहिले. पण तिथेही ते तग धरू शकले नाहीत. अखेर त्यांनी स्वतःचा पक्ष देखील काढून पाहिला. मात्र मोठ्या पक्षांच्या स्पर्धेत आपल्या पक्षाचा ठावठिकाणा लागणार नाही, हे लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता पक्षाने त्यांना उपनेतेपदी नियुक्त करून मोठी जबाबदारी दिली आहे. राजकारणातील मोठा अनुभव आणि संघटन कौशल्य ही सुभाष पाटील यांची उजवी बाजू असून लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीमध्ये पाटील यांच्या अनुभवाचा शिवसेनेच्या उबाठा गटाला फायदा होऊ शकेल, असे मानले जाते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software