- News
- पॉलिटिक्स
- भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एकहाती सत्ता मिळविण्यात केवळ एक जागा कमी पडलेल्या भाजपचा महापालिकेतील गटनेता आज, ५ डिसेंबरला ठरला. सभागृह गटनेतेपदी पक्षाने गोविंद केंद्रे यांची निवड केली आहे. केंद्रे हे प्रभाग २७ ब मधून विजयी झालेले नगरसेवक आहेत. आता महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रा. केंद्रे हे मंत्री अतुल सावे आणि खा. भागवत कराड यांचे निकटवर्तीय आहेत. छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद खुले (सर्वसाधारण) आहे. समर्थनगर प्रभागाचे समीर राजूरकर, मयूर पार्क प्रभागाचे विजय औताडे आणि रोजाबाग प्रभागाचे राजगौरव वानखेडे महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत. महापालिकेत भाजप ५७, एमआयएम ३३, शिंदे गट १३, ठाकरे गट ६, वंचित बहुजन आघाडी ४, राष्ट्रवादी शरद पवार गट १, काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
By City News Desk
Latest News
05 Feb 2026 21:36:47
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...

