मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने शहर पोलिसांनी छापा मारला. या वेळी सहा जणांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे अतिरिक्‍त कुमक मागवून पोलिसांनी आक्रमकता धारण केली. तेव्हा सहाही दंगलखोर अक्षरशः दुचाकी सोडून पळाले. त्यांच्या मागे पोलीस लागले, पण ते हाती लागले नाहीत. पोलिसांनी ३३ गोवंशांची सुटका करत सहा दुचाकींसह एकूण १४ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही थरारक कारवाई मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यावरून सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दगडफेक करणाऱ्यांसह सूत्रधाराचाही शोध सुरू केला आहे. उदार हे सहकाऱ्यांसह गस्त घालताना सिल्लोडच्या भराडी नाक्यावर आले असता सायंकाळी ७ ला त्यांना कळले, की ईदगाव ते भराडी रोडवरील वाळलेल्या मकाच्या शेतात विहिरीच्या बाजूला गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवले आहेत. पोलिसांनी लगेचच तिथे धाव घेतली. त्या ठिकाणी झाडांना आखूड दोरीने ३३ गोवंश निर्दयीपणे चारापाण्याविना बांधलेले होते. त्या ठिकाणी ६ जण होते.

त्यांनी पोलिसांसोबत प्रतिष्ठीत नागरिक सुजित राजपूत यांना पाहून त्यांच्या इर्टिगा कारसह पोलिसांवर तुफान दगडफेक सुरू केली. यात राजपूत यांच्या कारचे २५ हजारांचे नुकसान झाले. पोलिसांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त मागवून घेतला. पोलिसांचा फौजफाटा वाढल्याने सहाही जण त्यांच्या दुचाकी तिथेच सोडून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी या ठिकाणावरून एकूण १३ लाख १६ हजार रुपयांच्या ३३ गोवंशांची सुटका केली. तसेच सव्वा लाख रुपयांच्या सहा दुचाकीही जप्त केल्या. पोलिसांनी पकडलेल्या ३३ जनावरे उंडणगाव येथील गोशाळेत पाठवण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त

Latest News

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...
गॅलरीत उभ्या मुलीला टोकले, ती आईवर ओरडली... पुढे जे घडलं ते धक्कादायक.... रामनगरची घटना
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
मोठी बातमी : ग्राहकांना विकलेल्या ३ फ्लॅटवर परस्पर कर्ज उचलले, बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील बसैयेनगरातील धक्कादायक प्रकार
वाळूज एमआयडीसी पोलिसांची फौज उतरली रस्‍त्‍यावर!; पथसंचलनातून मतदारांना दिला सुरक्षिततेचा विश्वास!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software