१६ वर्षीय मुलीचे ६० वर्षीय वृद्धाकडून वारंवार लैंगिक शोषण!; करमाडच्या घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १६ वर्षीय मुलीवर ६० वर्षीय वृद्धाने लैंगिक अत्‍याचार केल्याची धक्कादायक घटना करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आली आहे. नराधम मुलीच्या आईचा गुरुवडील आहे. करमाड पोलिसांनी गुन्हा दाखल करताच वृद्ध फरारी झाला असून, पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.

दिगंबर गव्हाणे असे संशयित वृद्धाचे नाव आहे. तक्रारीनुसार, दिगंबरचे मुलीच्या घरी नियमित येणे-जाणे होते. त्याने गेल्या वर्षी मे, जून आणि जुलै महिन्यात जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून तो यायचा आणि तिला तसेच तिच्या आई-वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरस्ती करायचा. घाबरून मुलीने ही बाब कुणालाच सांगितली नाही. रविवारी (१ फेब्रुवारी) पहाटे अचानक मुलीला पोटदुखी सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला पिंप्रीराजा येथील खासगी रुग्णालयात आणले. अचानक प्रसुती कळा सुरू होऊन तिने मुलाला जन्म दिला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत व पोलीस उपनिरीक्षक दगडू तडवी यांनी भेट दिली. दिगंबरचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

सोशल मीडियावर तरुणीची बदनामी
सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून तरुणीची बदनामी करणाऱ्याविरुद्ध वैजापूर पोलिसांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला. विजय नरवाडे (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २० वर्षीय तरुणीच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते सुरू केले होते. अश्लील फोटो व अश्लील मेसेज त्याने त्यावर पोस्ट केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर तरुणीने वैजापूर पोलिसांत धाव घेतली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त

Latest News

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...
गॅलरीत उभ्या मुलीला टोकले, ती आईवर ओरडली... पुढे जे घडलं ते धक्कादायक.... रामनगरची घटना
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
मोठी बातमी : ग्राहकांना विकलेल्या ३ फ्लॅटवर परस्पर कर्ज उचलले, बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील बसैयेनगरातील धक्कादायक प्रकार
वाळूज एमआयडीसी पोलिसांची फौज उतरली रस्‍त्‍यावर!; पथसंचलनातून मतदारांना दिला सुरक्षिततेचा विश्वास!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software