मोठी बातमी : ग्राहकांना विकलेल्या ३ फ्लॅटवर परस्पर कर्ज उचलले, बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील बसैयेनगरातील धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ग्राहकांना विकलेल्या ३ फ्‍लॅटवर बिल्डरने बँक मॅनेजरला हाताशी धरून परस्पर ४० लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिन्सी पोलिसांनी बिल्डर मधुसुधन दिलीपराव उत्तरवार आणि बँक मॅनेजर संजय उत्तरवार या दोघांविरुद्ध बुधवारी (४ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र प्रल्हाद सानप (वय ४९, रा. प्लॅटीनम व्यंकटेश्वरा अपार्टमेंट बसैयेनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की ते एका कंपनीत सिनिअर मॅनेजर आहेत. जानेवारी २०१५ मध्ये त्यांना बसैयेनगर येथे प्लॅटीनम व्यंकटेश्वरा अपार्टमेंटचे काम सुरू असल्याचे तेथे लावलेल्या बोर्डवरून समजले. त्यानंतर ते व त्यांची पत्नी डॉ. रेखा राजेंद्र सानप यांनी या अपार्टमेंटचे काम पाहिले. तेथील परिसर आवडल्याने अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी करण्याचे ठरविले. बिल्डर मधुसुधन दिलीपराव उत्तरवार यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सानप भेटले. फ्लॅटची किंमत ३५ लाख रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सानप यांनी फ्लॅट क्रमांक १०२ खरेदी करण्याचा सौदा पक्का केला. २४ मार्च २०१५ ते ११ मे २०१५ पर्यंत सानप यांनी बिल्डर उत्तरवार यांना ७ लाख १ हजार रुपये दिले.

१९ ऑक्टोबर २०१५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्यांनी नोंदणीकृत इसार पावती करून घेतली. फ्लॅटची उर्वरित रक्कम २७ लाख ९९ हजार रुपये बांधकाम पूर्ण होईपर्यंत टप्याटप्याने देऊन रजिस्ट्री करून घ्यावी, असे ठरले होते. इसार पावती करतेवेळी बिल्डर उत्तरवार यांनी या फ्लॅटवर इतर कोणत्याही बँक अथवा पतपेढीचा कोणत्याही प्रकारचा बोजा नसून मिळकत दोषमुक्त असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सानप यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर सानप यांनी एलआयसी हौसिंग फायनान्स कंपनीकडे गृह कर्ज मंजुरीसाठी अर्ज केला. ३० सप्‍टेंबर २०१५ रोजी एलआयसी हौसिंग फायनान्सने त्यांना गृहकर्ज मंजूर केले. ३१ ऑक्‍टोबर २०१५ ते ३० जुलै २०१९ पर्यंत बिल्डर उत्तरवार यांना सानप यांनी पैसे दिले. ३१ जुलै २०१९ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात राजेंद्र सानप व डॉ. रेखा राजेंद्र सानप या दोघांच्या नावावर फ्‍लॅटची रजिस्ट्री करण्यात आली. तेव्हापासून हा फ्लॅट सानप दाम्‍पत्‍याच्या ताब्यात आहे.

...अन्‌ दाम्‍पत्‍याला धक्का बसला!
सप्टेंबर २०१९ मध्ये सानप दाम्‍पत्‍याला दि यवतमाळ अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक लि. शाखा सारंग सोसायटी गजानन महाराज मंदिराजवळ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून वकिलामार्फत फ्‍लॅटवर कर्ज असल्याची नोटीस मिळली. ती पाहून पाहून दाम्‍पत्‍याला धक्काच बसला. त्यानंतर बिल्डर उत्तरवार यांना भेटून सानप यांनी बँकेच्या नोटीसबाबत सांगितले. आमच्या फ्लॅटवर कर्ज कसे काय घेतले, याबाबत विचारपूस केली. त्यावर दोन महिन्यांत तुमच्या फ्लॅटवरील कर्ज निल करून देतो, असे म्हणून बिल्डर उत्तरवार यांनी वेळकाढूपणा करून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत सानप यांनी म्हटले आहे. त्यानंतर सानप यांनी त्यांच्या वकिलामार्फत १६ सप्‍टेंबर २०१९ रोजी बँक मॅनेजर, दि यवतमाळ अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक व बिल्डर मधुसुधन उत्तरवार यांना नोटीस पाठविली. मात्र बँकेने व बिल्डरने अ‌द्याप नोटीसचे उत्तर दिले नाही. फ्लॅटवरील कर्जाची माहिती घेण्यासाठी सानप हे यवतमाळ अर्बन बँकेत गेले असता बँक मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे सानप यांच्या लक्षात आले.

केवळ सानप हेच नाहीत तर बिल्डरने अन्य लोकांनाही फसवले...
प्लॅटीनम व्यंकटेश्वरा अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. १०२ हा सानप यांच्या मालकीचा असूनही बिल्डर मधुसुधन उत्तरवार यांनी त्याच्यावर कर्ज कसे उचलले आणि यवतमाळ अर्बन बँकेनेही कसे दिले, याबद्दल गौडबंगाल निर्माण झाले. केवळ सानप हेच नाहीत तर डॉ. रश्मी नितीन गुजराती यांच्या फ्लॅट नं. १०४ व इतर एक  अशा एकूण ३ फ्‍लॅटबाबतही असाच कारनामा बिल्डरने घडवला आहे. बिल्डरने परस्पर यवतमाळ अर्बन बँकेच्या मॅनेजरला हाताशी धरून ४० लाख रुपयांचे कर्ज उचलले आहे. तिन्ही फ्लॅटवर कर्ज घेण्यासाठी बिल्डरने खोटी कागदपत्रे दिली आणि मॅनेजरने कर्ज मंजूर केले, असे या प्रकरणात दिसून येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अरुणा घुले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त

Latest News

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...
गॅलरीत उभ्या मुलीला टोकले, ती आईवर ओरडली... पुढे जे घडलं ते धक्कादायक.... रामनगरची घटना
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
मोठी बातमी : ग्राहकांना विकलेल्या ३ फ्लॅटवर परस्पर कर्ज उचलले, बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील बसैयेनगरातील धक्कादायक प्रकार
वाळूज एमआयडीसी पोलिसांची फौज उतरली रस्‍त्‍यावर!; पथसंचलनातून मतदारांना दिला सुरक्षिततेचा विश्वास!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software