हिट ॲन्ड रन : महिला चालवत असलेल्या सुसाट कारने दुचाकीला उडवले, ३ जखमी, गादिया विहारजवळील घटना, कारचा नंबर आहे... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महिला चालवत असलेल्या सुसाट कारने दुचाकीला उडवले. मदतीला न थांबता वेगाने कार घेऊन निघून गेली. ही घटना गादिया विहार- शिवाजीनगर रस्‍त्‍यावरील CSM हॉस्पिटलसमोर शनिवारी (३१ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

रवींद्र कैलासनाथ चौधरी (वय ३६, रा. आशानगर, पंडीत जवाहरलाल नेहरू कॉलेजसमोर, शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की ते टाईल फिटींगची कामे करतात. शनिवारी (३१ जानेवारी) कांचनवाडी येथे टाईल फिटींगची कामे करून सायंकाळी सातला मोटारसायकलीने (MH 20 BF7428) सहकारी प्रभाकर चौधरी व राहुल यादव यांच्यासह कांचनवाडीकडून शिवाजीनगरला येत होते. देवळाई चौकात नेहमी गर्दी असते. त्यामुळे ते हॉटेल निशांत पार्कजवळून डावीकडे वळवून पीडब्ल्यूडी कॉलनीतून शहानुरमिया दर्गाजवळील रेल्वे बोगद्यातून गादिया विहारमार्गे शिवाजीनगरकडे जाण्यासाठी वळले.

CSM हॉस्पिटलसमोर त्यांच्या मोटारसायकलीला कारने (MH 01 DE 3680) च्या महिला चालकाने जोरात धडक दिली. यात चौधरी हे मोटारसायकलीसह पडून दोन्ही हातांना, पायांना खरचटून जखमा झाल्या. छातीला गंभीर मुक्का मार लागला. चेहऱ्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या प्रभाकर चौधरी व साहुल यादव यांनासुध्दा बराच मार लागला. लोकांनी मदतीला धावून तिघांनाही CSM  हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कारचालक महिला कोणत्याही प्रकारची मदत न करता तेथून निघून गेली, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पृथ्वीराज चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त

Latest News

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...
गॅलरीत उभ्या मुलीला टोकले, ती आईवर ओरडली... पुढे जे घडलं ते धक्कादायक.... रामनगरची घटना
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
मोठी बातमी : ग्राहकांना विकलेल्या ३ फ्लॅटवर परस्पर कर्ज उचलले, बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील बसैयेनगरातील धक्कादायक प्रकार
वाळूज एमआयडीसी पोलिसांची फौज उतरली रस्‍त्‍यावर!; पथसंचलनातून मतदारांना दिला सुरक्षिततेचा विश्वास!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software