गॅलरीत उभ्या मुलीला टोकले, ती आईवर ओरडली... पुढे जे घडलं ते धक्कादायक.... रामनगरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १६ वर्षीय मुलीचे रामनगरमधून अपहरण झाले आहे. गॅलरीत उभी राहिल्याने आईला तिला रागावली होती. त्यानंतर आईशी भांडण होऊन ती घरातून गेली, तशी परतली नाही. खासगी नोकरी करणाऱ्या तिच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांची मोठी मुलगी १२ वीत शिकते. ती सध्या घरीच अभ्यास करत होती. शनिवारी (३१ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास मायलेकी घरी होत्या. मुलगी गॅलरीत उभा होती. तिच्या आईने तिला म्हटले, की तू गॅलरीत कशाला उभी आहे, घरात जा... त्यावर मुलगी आईला उलटसुलट बोलू लागली. त्यामुळे आई तिला रागावली व रागाच्या भरात चापट मारली. त्यावर ती मोठ्याने आईवर ओरडली. त्यानंतर मी बाहेर खायला आणायला चालले, असे म्हणून ती घरातून रागात निघून गेली. आई तिच्या मागे गेली तर तिने हाताला झटका मारून गल्लीने पळून गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा आजूबाजूला व नातेवाइकांकडे, मैत्रिणीकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तिचे कुणीतरी अपहरण केल्याचे तक्रारीत तिच्या आईने म्हटले आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त

Latest News

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...
गॅलरीत उभ्या मुलीला टोकले, ती आईवर ओरडली... पुढे जे घडलं ते धक्कादायक.... रामनगरची घटना
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
मोठी बातमी : ग्राहकांना विकलेल्या ३ फ्लॅटवर परस्पर कर्ज उचलले, बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील बसैयेनगरातील धक्कादायक प्रकार
वाळूज एमआयडीसी पोलिसांची फौज उतरली रस्‍त्‍यावर!; पथसंचलनातून मतदारांना दिला सुरक्षिततेचा विश्वास!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software