- News
- जिल्हा न्यूज
- वैजापूर बाजार समितीच्या राजकारणात शिंदे गटाचा भाजपकडून गेम!; सभापती रामहरी जाधव यांच्याविरुद्ध १३ सं...
वैजापूर बाजार समितीच्या राजकारणात शिंदे गटाचा भाजपकडून गेम!; सभापती रामहरी जाधव यांच्याविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास ठराव!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताकारणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होऊ घातली आहे. शिंदे गटाचे सभापती रामहरी जाधव यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत १८ पैकी १३ संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला आहे. जाधव यांना पायउतार करून भाजपचा सभापती विराजमान करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी शिंदे गटातीलच काही नाराज मंडळी मदत असल्याची चर्चा आहे.
२९ एप्रिल २०२३ रोजी भाजप- शिंदे गटाने एकत्र येऊन बाजार समितीवर सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. जिल्हा परिषद निवडणुकीतही हे पक्ष आमनेसामने ठाकले आहेत. वाकला जिल्हा परिषद गटातून सभापती रामहरी जाधव यांच्या पत्नी पार्वताबाई जाधव या शिंदे गटाच्या पाठिंब्याने अपक्ष निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या अधिकृत उमेदवार आणि बाजार समितीच्या उपसभापती शिवकन्या मधुकर पवार रिंगणात आहेत. त्यामुळे रामहरी जाधव यांना पायउतार करण्याचे मोठे पाऊल भाजपने उचलले आहे. संचालक गणेश इंगळे यांना शिंदे गटाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवायची होती. मात्र त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी व प्रशांत त्रिभुवन यांनी शिंदे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गणेश इंगळे सध्या सवंदगाव गटातून भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत. इंगळे आणि त्रिभुवन यांच्या पक्षांतरामुळे बाजार समितीत भाजपचे संख्याबळ वाढले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
By City News Desk
Latest News
05 Feb 2026 21:36:47
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...

