- News
- पॉलिटिक्स
- महापौर, उपमहापौर निवडणूक होईपर्यंत कुणीही शहर सोडू नये... भाजपच्या नगरसेवकांना स्पष्ट सूचना!, शितोळे...
महापौर, उपमहापौर निवडणूक होईपर्यंत कुणीही शहर सोडू नये... भाजपच्या नगरसेवकांना स्पष्ट सूचना!, शितोळे यांच्या घरी ५७ नगरसेवकांसाठी झाले स्नेहभोजन!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेतील सत्तेत शिंदे गटाला सोबत घेण्यात येत असले तरी, त्यांना उपमहापौरपद देण्याची तयारी भाजपची नाही, असे आता दिसून येत आहे. महापौर, उपमहापौर भाजपचाच होणार, असे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित ५७ नगरसेवकांसाठी भाजपने बुधवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी स्नेहभोजन ठेवले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. शितोळे यांच्या घरीच हा मेजवानीचा बेत आखला होता. महापौर, उपमहापौर निवडणूक होईपर्यंत कुणीही शहर सोडू नये, अशा सूचना नगरसेवकांना भाजपने केल्या आहेत.
महापालिकेत बहुमतासाठी भाजपला फक्त एक जागा कमी पडली आहे. त्यामुळे नगरसेवक फुटण्याचा कोणताही धोका भाजपला वाटत नाही. भाजपची एकूणच ‘शक्ती’ पाहता तसे धाडस करण्याचा विचारही कुणी करणार नाही, हे स्पष्ट असल्याने ना नगरसेवकांची सहल आयोजित करण्यात आली, ना कुठे त्यांना एकत्र मुक्कामी करून ठेवण्यात आले. फक्त शहर सोडून न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. पाच वर्षांत १५ महिन्यांसाठी एकेक महापौर, उपमहापौर असे आठ जण, स्थायी समिती सभापती पाच जण, सभागृह नेता पाच व एक गटनेता मिळून १९ नगरसेवकांना संधी भाजप देणार आहे.
१३ नगरसेवक निवडून आणणाऱ्या शिंदे गटाचा गटनेता कोण होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यावरून सध्या या पक्षात दुफळी माजली असून, ८ नगरसेवक एका बाजूने तर ५ नगरसेवक दुसऱ्या बाजूने आहेत. यामुळेच मनपा निवडणुका होऊन २० दिवस उलटले तरी गटनेता ठरलेला नाही. भाजप सत्तेत सोबत घेणार असला तरी, पदरात काही देणार नाही, हे सध्या दिसून येत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
By City News Desk
Latest News
05 Feb 2026 21:36:47
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...

