वाळूज एमआयडीसी पोलिसांची फौज उतरली रस्‍त्‍यावर!; पथसंचलनातून मतदारांना दिला सुरक्षिततेचा विश्वास!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेले आरोप-प्रत्‍यारोप आणि कुलूषित झालेले वातावरण पाहता मतदान निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आज, ५ फेब्रुवारीला दुपारी १ ते सव्वा तीन दरम्यान आपल्या हद्दीत पथसंचलन केले.

पोलीस ठाण्यातून सुरू झालेले पथसंचलन रांजणगाव शेणपुंजी फाटा,  छत्रपती शिवाजी महाराज चौक, कमळापूर फाटा, रांजणगाव ग्रामपंचायत कार्यालय, एकतानगर, दत्तनगर फाटा, एनआरबी चौक, इंद्रप्रस्थ कॉलनी, जयभवानी चौक, आम्रपाली बौद्ध विहार, अण्णाभाऊ साठे चौक, वडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वडगाव कोल्हाटी येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त डॉ. भगीरथी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन झाले. त्यात ७ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ४५ पोलीस अंमलदार, स्ट्रायकिंग फोर्स, होमगार्डचा सहभाग होता. ढाल, लाठी, हेल्मेट या सुरक्षा साहित्यांसह मोबाइल पथके आणि चार अतिरिक्त वाहनांचा सहभाग होता. नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करावे, असा संदेश पोलिसांनी पथसंचलनातून दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त

Latest News

मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त मोठी बातमी : सिल्लोडमध्ये गोवंशांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांनी ६ दंगलखोरांना पिटाळले, ३३ गोवंशांची सुटका, ६ दुचाकी जप्त
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहराजवळील ईदगाव ते भराडी रोडवरील एका शेतात ३३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळल्याने...
गॅलरीत उभ्या मुलीला टोकले, ती आईवर ओरडली... पुढे जे घडलं ते धक्कादायक.... रामनगरची घटना
भाजपच्या महापालिका गटनेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे
मोठी बातमी : ग्राहकांना विकलेल्या ३ फ्लॅटवर परस्पर कर्ज उचलले, बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील बसैयेनगरातील धक्कादायक प्रकार
वाळूज एमआयडीसी पोलिसांची फौज उतरली रस्‍त्‍यावर!; पथसंचलनातून मतदारांना दिला सुरक्षिततेचा विश्वास!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software