Political Special Story : विधानसभा निवडणुकीसाठी छ. संभाजीनगरातील राजकीय हालचाली गतिमान; शहा मंगळवारी शहर मुक्कामी, ९०० पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक, तिसरी आघाडी छ. संभाजीनगरातून करणार श्री गणेशा, भाजपच्या हालचालींमुळे उद्धव ठाकरे अलर्ट, पदाधिकाऱ्यांना म

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा मंगळवारी (२४ सप्टेंबर) ठरला असून, ते मराठवाड्यातील ९०० पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून, जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना करणार आहेत. दुसरीकडे राज्‍यात तिसऱ्या आघाडीही उदयाला येत असून, या आघाडीनेही छ. संभाजीनगरला केंद्रस्थानी […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा मंगळवारी (२४ सप्टेंबर) ठरला असून, ते मराठवाड्यातील ९०० पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून, जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना करणार आहेत. दुसरीकडे राज्‍यात तिसऱ्या आघाडीही उदयाला येत असून, या आघाडीनेही छ. संभाजीनगरला केंद्रस्थानी ठेवले आहे. नेते जुळत असले तरी कार्यकर्ते संभ्रमीत असल्याने त्‍यांना जुळविण्यासाठी गुरुवारी या आघाडीचा पहिला मेळावा शहरात गुरुवारी (२६ सप्टेंबर) होणार आहे. तिसरीकडे ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हेही भाजपच्या भूमिकेमुळे अलर्ट झाले आहेत. त्‍यांनी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीपासून मात्र चंद्रकांत खैरे यांना दूर ठेवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

अमित शहा छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्यातील ९०० पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जास्तीत जास्त जागा ताब्‍यात घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सरसावले आहेत. त्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात २४ सप्टेंबरला मराठवाड्यातील नेते, पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान बैठक होईल.

शहा हे ४६ मतदारसंघांचा आढावा घेणार असून, दोन तासांच्या बैठकीत एका मतदारसंघासाठी केवळ ३ मिनिटांचाच वेळ मिळणार असल्याने एवढ्या कमी वेळेत मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार का, याबद्दल शंका निर्माण होत आहे. भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही बैठकीला उपस्थिती असणार आहे. ९०० पदाधिकारी बैठकीला येणार असल्याचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले. आढावा बैठकीनंतर शहा शहरात मुक्कामी असून २५ सप्टेंबरला सकाळीच घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन ते नाशिकला रवाना होणार आहेत.

तिसऱ्या आघाडीच्या केंद्रस्थानी छ. संभाजीनगर?, कडू, शेट्टी, चटप गुरुवारी शहरात मेळावा घेणार
महायुती, महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असताना, राज्यात तिसरी आघाडीचीही जुळवाजुळव सुरू आहे. तिसऱ्या आघाडीचा मेळावा गुरुवारी (२६ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार असून, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप आणि इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नेते एकत्र आले, पण कार्यकर्तेही एकत्र येणे आवश्यक असल्याने हा मेळावा घेण्यात येत असल्याचे शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकारांना सांगितले. मेळावा यशस्वी होण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या घटक पक्षांकडून प्रयत्‍न केले जात आहेत. विधानसभा निवडणूक दीड-दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्‍यामुळे तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव जोरात सुरू आहे. याबाबत धोंडगे यांनी सांगितले, की लोकांना सक्षम पर्याय हवा असल्यानेच नेते एकत्र आले आहेत. कपिल पाटील यांच्यासोबतही चर्चा सुरू असून आणखी काही लोकांना एकत्र घेण्यासंदर्भात प्रयत्‍न केले जाणार असल्याचे ते म्‍हणाले.

भाजपच्या हालचालींमुळे उद्धव ठाकरे दक्ष, मातोश्रीवर दानवेंच्या उपस्थितीत बैठक, खैरेंना ठेवले दूर…
भाजपच्या मराठवाड्यातील हालचाली पाहून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अलर्ट झाले आहेत. त्‍यांनी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील जागांचा शनिवारी आढावा घेतला. ‘मातोश्री’ वर यासाठी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना बाेलावले होते. मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रण नसल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याचे खापर खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर फोडले असून, त्यांनीच बैठकीतून वगळल्याचा आरोप खैरे यांनी केला.

दानवे यांनी मात्र पक्षप्रमुखांचाच हा निर्णय असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील ९ पैकी ७ जागांवर उद्धव ठाकरे यांनी दावा सांगितला आहे. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि फुलंब्री हे दोन मतदारसंघ सोडता सात मतदारसंघांचा आढावा घेतला. बैठकीला राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब थोरात, नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. बैठकीला न बोलावल्याने खैरे म्हणाले, की उद्धव ठाकरे मला कधीच टाळत नाहीत. ही प्राथमिक लेव्हलची बैठक होती. यानंतर बऱ्याच बैठका होणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला! छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्‍याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software