नागरिकांना त्रास दिल्यास गय नाही!; महापौर राजूरकरांनी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुनावले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मालमत्ता कर लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना त्रास दिल्यास गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महापौर समीर राजूरकर यांनी आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासमक्षच दिला.

सोमवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी कर मूल्यनिर्धारण विभागाच्या आढावा बैठकीत महापौर राजूरकर बोलत होते. उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महापालिका उपायुक्त विकास नवाळे, वॉर्ड अधिकारी, मालमत्ता कर वसुलीचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी महापौर राजूरकर म्हणाले, की, दरवर्षी थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करावी. त्याचा अहवाल पुढील ३० दिवसांत सादर करा. नगररचना विभागाकडून नागरिकांना वेळेवर परवानगी का मिळत नाही, फाइल आल्यानंतर अधिकाऱ्यांकडे किती दिवसांत जावी, हे ठरलेले आहे. मग काही ठिकाणी फाइल अडकून का पडते? अत्याधुनिक पद्धतीत फाइल दोन महिन्यांनी आपोआप मंजूर व्हावी, या दृष्टीने विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. नगररचना विभागातील भ्रष्टाचार शंभर टक्के बंद झालाच पाहिजे. किरकोळ कारणांसाठी फाइल अडवून नागरिकांना त्रास देणे, अपेक्षा ठेवणे अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Latest News

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...
फुलंब्री पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसची झाडाझडती!; दोन हॉटेलमध्ये आढळले ५ जोडपे!‌!
आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या!; खंडाळा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
घरातून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह!; पैठण तालुक्यातील बालानगरची घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software