- News
- जिल्हा न्यूज
- गंगापूरमध्ये भरदुपारी हल्लकल्लोळ : २३ वर्षीय तरुणावर भररस्त्यात पाठलाग करून धारदार शस्त्राचे सपास...
गंगापूरमध्ये भरदुपारी हल्लकल्लोळ : २३ वर्षीय तरुणावर भररस्त्यात पाठलाग करून धारदार शस्त्राचे सपासप वार...चौघांनी घडवला थरार!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : किरकोळ बाचाबाचीतून २३ वर्षीय तरुणावर चौघांनी वर्दळीच्या रस्त्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही खळबळजनक घटना गंगापूर शहरातील पंचायत समिती परिसरात झेरॉक्स दुकानासमोर सोमवारी (२३ फेब्रुवारी) दुपारी ४ च्या सुमारास घडली.
अक्षय वैजापूर मार्गावरील पंचायत समिती परिसरात न्यायालयासमोर असलेल्या एका झेरॉक्स दुकानासमोर उभा होता. तेथे आलेल्या हर्ष गायकवाड व अशोक मावस यांच्यासोबत त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला. संतप्त हर्षने फोन करून दोघांना बोलावले. ओम्नी वाहनातून दीपक साळवे तर दुचाकीवर अभिषेक मावस आला. दीपक साळवेने खिशातील धारदार शस्त्राने अक्षयच्या पाठीवर हल्ला केला. अक्षय जीव वाचविण्यासाठी पळत रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेला. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याच्यावर पुन्हा पुन्हा वार केले. अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मोठी गर्दी जमल्याने हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अक्षयवर हल्ला केवळ बाचाबाचीवरून झाला, की पूर्ववैमनस्यातून झाला, हे हल्लेखोरांना पकडल्यानंतरच समोर येणार आहे. सध्या अक्षयची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
By City News Desk
ड्रग्जमाफियाची अशपाक पटेलची चंपा चौक, शहागंजमधून काढली धिंड
By City News Desk
Latest News
24 Feb 2026 21:57:49
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...

