गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर अतिरक्तस्त्राव होऊन २८ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. आयशा समीर मुल्ला (रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

घाटनांद्रा येथे आयशा यांनी १० फेब्रुवारीला गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांना सुरुवातीला किरकोळ त्रास होऊन नंतर वेगाने तब्येत बिघडत गेली. अतिरक्तस्त्रावामुळे परिस्थिती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे आठ दिवस उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. अतिरक्तस्त्राव हेच मृत्यूचे मुख्य कारण असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे करत आहेत. आयशा यांचा हा दुसरा विवाह होता. त्यांच्या पश्चात पहिल्या पतीपासून दोन आणि दुसऱ्या पतीपासून दोन अशी एकूण चार लहान मुले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Latest News

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...
फुलंब्री पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसची झाडाझडती!; दोन हॉटेलमध्ये आढळले ५ जोडपे!‌!
आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या!; खंडाळा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
घरातून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह!; पैठण तालुक्यातील बालानगरची घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software