घरातून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह!; पैठण तालुक्यातील बालानगरची घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेतकऱ्याचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह सोमवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी ८ च्या सुमारास आढळल्याने पैठण तालुक्यातील बालानगर शिवारात खळबळ उडाली आहे. पठाण अहमद जाफर (वय ६०, रा. बालानगर, ता. पैठण) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी १२ च्या सुमारास पठाण अहमद जाफर हे घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. रात्रीही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सोमवारी सकाळी कपाशीच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला. पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ञांनी तपासणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. पठाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. घातपात आहे की आत्महत्या, याबाबत तपास करण्यात येत असल्याचे श्री. जगदाळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, रविवारीच बालानगर येथील दशरथ एकनाथ फाटके (वय ५०) हेही बेपत्ता झाल्याची नोंद पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांचाही शोध सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Latest News

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...
फुलंब्री पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसची झाडाझडती!; दोन हॉटेलमध्ये आढळले ५ जोडपे!‌!
आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या!; खंडाळा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
घरातून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह!; पैठण तालुक्यातील बालानगरची घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software