छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध उद्योगपतीची बहिणींकडून फसवणूक, दोन कोटींच्या वारसाहक्कावर डल्ला!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योगपती सुनीलकुमार हरिकिशन कलाणी (वय ६४, रा. बीड बायपास) यांची फसवणूक दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर, दोन सख्ख्या बहिणींनीच केल्याचे समोर आले आहे. सातारा पोलिसांनी या दोन्ही बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल केल आहे. सुनीता दिलीप लाहोटी (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि शोभना शरद टुवानी (रा. जयपूर, राज्यस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या बहिणींची नावे आहेत.

सुनिता आणि शोभना यांनी आईला विश्वासात घेऊन भावाच्या हिश्श्याचेही बँक खात्यातील पैसे, प्लॉटसह शेअर्स विकून एक कोटी ९५ लाख रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक केल्याची तक्रार आहे. उद्योजक सुनीलकुमार कलाणी यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा लिंबेजळगाव येथे कारखाना आहे. त्यांचे वडील हरिकिशन कलाणी मूळचे पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील व्यापारी होते. वडिलांचे २०२० साली कॅन्सरने निधन झाले. त्यांनी तयार केलेल्या मृत्यूपत्रानुसार सिलीगुडी येथील मालमत्ता आणि बँक ठेवींचे उत्तराधिकारी म्हणून सुनील कुमार यांचे होते. याचा राग दोन्ही बहिणींना होता. या रागातून त्यांनी कट रचला. आजारी आईला विश्वासात घेऊन जयपूरला नेले.

त्या ठिकाणी बँक खात्यांवरील आणि डी-मॅट खात्यावरील ‘नॉमिनी' म्हणून असलेले सुनील कुमार यांचे नाव बदलून स्वतःचे नाव लावून घेतले. २० मार्च २०२४ रोजी आईच्या मृत्यूनंतर हा सर्व प्रकार समोर आला. आईच्या एचडीएफसी डी-मॅट खात्यावरील ८० लाख रुपयांचे शेअर्सही बहिणींनी परस्पर स्वतःच्या खात्यावर वर्ग केले होते. अॅक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँकेतील प्रत्येकी १५ लाख आणि कोटक महिंद्रा बँकेतील ५० लाख रुपये अशा मोठ्या रकमाही दोघींनी नॉमिनी बदलून काढून घेतल्या. जयपूर शहरातील सुशांत सिटी येथील प्लॉटही आईच्या कोऱ्या अर्जावर सह्या घेऊन ३५ लाखांना विकल्याचे समोर आले. अधिक तपास सातारा पोलीस करीत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Latest News

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...
फुलंब्री पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसची झाडाझडती!; दोन हॉटेलमध्ये आढळले ५ जोडपे!‌!
आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या!; खंडाळा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
घरातून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह!; पैठण तालुक्यातील बालानगरची घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software