पैठण गेटवर दोन गटांत तुंबळ हाणामारीने मध्यरात्री हल्लकल्लोळ!; ६ जखमी, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण गेटवर सोमवारी (२५ ऑगस्ट) पहाटे दोनला (मध्यरात्री) दोन गटांत लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील ५ जण गंभीर जखमी झाले. त्‍यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, क्रांती चौक पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंगेश काशीनाथ सुरळकर (वय ३३, रा. पैठणगेट, सब्जीमंडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फारुक खान कदीर खान, युसूफ खान कदीर खान, फरान खान, मुजम्मील खान, सलीम खान कदीर खान, अरबाज खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मंगेश डिश टीव्ही फिटिंगचे काम करतात. सोमवारी (२५ ऑगस्ट) पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) मंगेश के. के. मोबाईल शॉप, पैठणगेट पार्किंगसमोर, पैठणगेट येथून जात असताना ओळखीचे फारुक खान कदीर खान, युसूफ खान कदीर खान, फरान खान, मुजम्मील खान, सलीम खान कदीर खान, अरबाज खान हे सर्वजण त्यांच्या दुकानाजवळ उभे होते. त्यांनी मंगेश यांना अडवून जातिवाचक शिविगाळ केली. मुजम्मील खान याने मंगेश यांच्या तोंडावर दगड मारून जखमी केले. तो ओरडल्याने त्याला वाचवण्यासाठी गल्लीतील तुषार चाबुकस्वार आला असता त्यालासुद्धा सर्वांनी मारहाण केली. वाचविण्यासाठी आलेल्या इतर लोकांना सुद्धा शिविगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. मंगेश यांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतले. त्‍यानंतर पोलिसांत तक्रार दिली.

खान यांनीही दिली तक्रार...
के. के. मोबाइल कलेक्शनचे मालक फारूक खान कदीर खान (रा. पैठणगेट पार्किंगसमोर, के. के. मोबाईल कलेक्शनच्या वरती, एम. सी. पार्किंगसमोर, पैठणगेट) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगेश सुरळकर, विकी (पूर्ण नाव माहीत नाही), शिवा मगरे, तुषार, आशिष नरवडे, रोहन चाबुकस्वार, अजय, कुणाल (सर्व रा. सब्जी मंडी, पैठणगेट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत फारूक खान यांनी म्हटले आहे, की ते आणि त्यांचा भाचा तौसीफ याच्या मोटारसायकलीवर भाचीच्या साखरपुड्याचे सामान बागवान हॉल येथून घेऊन ते घरी आले. घरासमोरील रोडवर मोटारसायकल उभी करत असताना मोहल्ल्यातील मंग्या व विकी हे दारूच्या नशेत जवळ आले. काहीएक कारण नसताना ते शिवीगाळ करू लागले. खान यांनी त्याला समजावून सांगितले, तरीही मंग्या शिवीगाळ करतच अंगावर धावत आला. नंतर मंग्या त्याच्या घराकडे पळत गेला व त्याने शिवा मगरे, विक्की, तुषार, आशिष नरवडे, कुणाल, अजय, रोहन चाबुकस्वार या सर्वांना घेऊन खान यांच्यावर हल्ला चढवला. विक्की (रा. खोकडपुरा) व रोहन चाबुकस्वार या दोघांनी लोखंडी रॉडने खान यांच्या डाव्या बाजूस पाठीवर व डाव्या हातावर मारहाण केली.

त्यामुळे पुतण्या फरान खान, पुतण्याचा मुलगा मुजम्मील खान, भाभी जरीना फेरोज खान व मुलगी सायमा खान हे भांडण सोडविण्यासाठी आले असता तुषार व शिवा मगरे यांनी पुतण्या फरान खान याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. मुजम्मील यास विक्की, अजय आणि रोहन चाबुकस्वार यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने उजव्या पायावर जोराचे फटके मारून मुजम्मीलचा पाय जखमी केला. जरीना फेरोज खान व सायमा खान या दोघींना आशिष व मंग्या यांनी शिविगाळ करून प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. त्यानंतर मंग्या व त्याच्यासोबतचे वरील सर्व जणांनी शिवीगाळ करत धमकी देऊन पळून गेले. खान आणि इतरांनी घाटीत उपचार घेतले. फरान खानवर घाटीत उपचार सुरू आहेत. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना

Latest News

गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : गणपती प्रतिष्ठापनेसाठी डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पैठण...
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
चालकाला फिट आल्याने नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर!, सेव्हन हीलजवळील घटना
त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक
रस्ता रूंदीकरणाविरुद्ध विनोद पाटील आक्रमक, मनपा आयुक्‍तांच्या बंगल्यावर धडक, मालमत्ताधारकांची जोरदार घोषणाबाजी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software