त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतून ५ आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ अशा ६ दुचाकी त्रिकुटाने चोरी केल्या होत्‍या. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक करून या ६ दुचाकी जप्त केल्या असून  त्‍यांचा तिसरा साथीदार फरारी आहे. ही कारवाई मंगळवारी (२६ ऑगस्ट)  करण्यात आली.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (२५ ऑगस्ट) दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्‍याचा तपास सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांना गोपनीय बातमीदाराने कळवले, की ही दुचाकी आनंद सुनिल बनसोडे (वय २१, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर), अजय सुरेश चव्हाण (वय २४, रा. टोकी, ता. गंगापूर) यांनी चोरी केली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्‍यांनी विकास ज्ञानेश्वर पवार (रा. श्रीरामपूर) याच्यासोबत मिळून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

चोरलेल्या दुचाकी अजयच्या घराजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तिथे जाऊन ६ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त अतुल पंकजकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस अंमलदार बाबासाहेब काकडे, जालींदर रंधे, सुरेश कचे, सुरेश भिसे, वैभव गायकवाड, शिवनारायण नागरे, नितीन इनामे, समाधान पाटील, लखन घुसिंगे, संतोष बमनात यांनी केली. सर्व संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना

Latest News

गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : गणपती प्रतिष्ठापनेसाठी डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पैठण...
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
चालकाला फिट आल्याने नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर!, सेव्हन हीलजवळील घटना
त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक
रस्ता रूंदीकरणाविरुद्ध विनोद पाटील आक्रमक, मनपा आयुक्‍तांच्या बंगल्यावर धडक, मालमत्ताधारकांची जोरदार घोषणाबाजी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software