वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर दुर्घटना : ट्रकला मागून दुसरा ट्रक धडकला, खामगावच्या चालकाचा मृत्‍यू, शेगावचा क्‍लिनर जखमी

On

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव ट्रकने दुसऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. यात एका ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्‍यू झाला, तर एकजण जखमी झाला. ही दुर्घटना समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात (ता. वैजापूर) रविवारी (२५ ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास घडला.

शेख अन्वर शेख गफार (वय ४०, रा. आवार, ता. खामगाव) मृत्‍यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव असून, त्याचा भाचा ट्रकचा क्‍लिनर शेख महंमद शेख असरार (वय १९, रा. शेगाव) जखमी झाला आहे. शेख अन्वर ट्रकमध्ये (क्र. एमएच २८ बीबी ८०८१) खामगाव येथून तूर भरून घेऊन मुंबईला जात होता. जांबरगाव शिवारात समोर धावणाऱ्या ट्रकला (क्र. एमएच आरजे ५० जीए ५२४९) अचानक चालकाने बाजूला घेतले.

त्यामुळे अंदाज न आल्याने अन्वर यांच्या ट्रकने त्याला मागून जोरात धडक दिली. यात शेख अन्वरचा मृत्‍यू झाला तर ट्रकमध्ये सोबत बसलेला शेख महंमद जखमी झाला. अपघातानंतर दुसऱ्या ट्रकचा चालक फरारी झाला. पोलिसांनी मृत व जखमी यांना रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. दुसऱ्या ट्रकच्या चालकाविरुद्ध वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना

Latest News

गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : गणपती प्रतिष्ठापनेसाठी डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पैठण...
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
चालकाला फिट आल्याने नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर!, सेव्हन हीलजवळील घटना
त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक
रस्ता रूंदीकरणाविरुद्ध विनोद पाटील आक्रमक, मनपा आयुक्‍तांच्या बंगल्यावर धडक, मालमत्ताधारकांची जोरदार घोषणाबाजी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software