मोठी बातमी : जिल्हा परिषद निवडणूक भाजप-शिंदे गट युती करून लढणार, मंत्री सावे, शिरसाटांची घोषणा, सत्तारांमुळे सिल्लोड-सोयगावमध्ये स्वतंत्र लढत, युतीच्या घोषणेनंतर वैजापूर भाजप कार्यकर्त्यांचा राडा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणी युती तुटली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी भाजप-शिवसेनेने घेत आज, २० जानेवारीला युतीची घोषणा करत जागा वाटपाबद्दलही स्‍पष्टपणे सांगितले. भाजप २७ तर शिवसेना २५ गटांत लढणार असून, तशी माहिती मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांना दिली. युती झाल्याचे स्‍पष्ट झाल्यानंतर वैजापूरचे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी युती तोडावी म्हणून मंत्री सावे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली.

महापालिका निवडणुकांच्या वेळी भाजप-शिवसेनेच्या १२ बैठका होऊनही जागा वाटपावर तोडगा निघाला नव्हता. जिल्हा परिषद निवडणुकीत तसे होऊ नये याची खबरदारी दोन्ही पक्षांच्या नेत्‍यांनी घेतल्याचे दिसून आले. जालना रोडवरील हॉटेल कीजमध्ये आज दुपारी दुसऱ्यांदा भाजप-शिवसेनेच्या नेत्‍यांची बैठक झाली. बैठकीला भाजपच्या वतीने मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, आमदार संजय केणेकर तर शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदिपान भुमरे, आ. रमेश बोरणारे, आ. संजना जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.  दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने दोन्हींकडून जास्त जागांची मागणी सुरू होती. त्यामुळे मंत्री शिरसाट संतापून बैठकीतून बाहेर पडल्याचे दिसले.

मात्र खा. संदिपान भुमरे यांनी त्यांच्या मागे जात समजूत काढून परत आणले. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात आ. सत्तार हे स्वबळावर लढण्याचा हट्ट धरून असल्याने त्या दोन तालुक्यातील ११ जागा वगळता वगळता अन्य ७ तालुक्यांत युतीत ही निवडणूक लढण्याचे ठरले. बिडकीनच्या जागेवर भाजप लढणार असल्याचे भुमरे यांनी पत्रकारांना सांगितले. आमचा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. युती म्हटलं की, कुठेतरी मागेपुढे होते. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे त्यांनी सांगितले.

वैजापूरमधील भाजप कार्यकर्त्यांचा राडा...
सिल्लोडप्रमाणेच वैजापूरमध्येही शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यातच आठपैकी अवघ्या ३ जागा भाजपच्या वाट्याला आल्याचे कळताच कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी युती तोडा, असा हट्ट धरला आणि त्यासाठी आक्रमक झाले. सावे यांच्या गाडीला घेराव घातला. पोलिसांच्या बंदोबस्तात सावे निघून गेले. कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. भाजप नेत्यांना शिव्या देणाऱ्या व्यक्तींचे काम आम्ही करायचे का? असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!

Latest News

वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले! वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर मंगळवारी (१७ मार्च) भल्या पहाटे साडेपाचला...
‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software