उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज बाजार इतका फोफावला आहे, की एवढ्या कारवाया होऊनही हा बाजार संपुष्टात येण्याऐवजी नवनवीन माफिया, तस्कर तयार होऊन दिवसेंदिवस चिंताजनक स्थिती निर्माण होत चालली आहे. आता तर परजिल्ह्यातील ड्रग्ज तस्करांनाही छत्रपती संभाजीनगर हे या अवैध व्यवसायासाठी फायदेशीर केंद्र भासू लागले आहे. सोमवारी (१६ मार्च) दुपारी चारच्या सुमारास शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून ही बाब दिसून आली. चिकलठाणाजवळील मसनतपूरच्या शहानगर येथील गल्ली नं. ५ मध्ये ठाण्यावरून आलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणांनी चक्क एमडी ड्रग्जची फॅक्टरी थाटल्याचे समोर आले आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाने छापा मारून दोन्ही तरुणांना अटक करत हा कारखाना उद्‌ध्वस्त केला.

रोशन रवींद्र कदम (वय ३२), आणि मयूर दीपक जाधव (वय २३, दोघे रा. कोपरी, आनंदनगर, ओम कांगुरी मित्रमंडळ, ठाणे ईस्ट) अशी अटक केलेल्या बहाद्दरांची नावे आहेत. रोशनने केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. मयूर चालक असून, त्यांच्या मित्राची छत्रपती संभाजीनगर सासरवाडी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्ज व्यवसाय फोफावला आहे, त्याचे त्यांना आकर्षण झाले आणि ठाण्यावरून हे शहर त्यांनी व्यवसायासाठी निवडल्याचे दिसते. त्यांच्या ताब्यातून ६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलीस पथकाने छापा मारला तेव्हा कोंबड्यासाठी तयार केलेल्या शेडजवळील सहा बाय सहा फुटांच्या खोलीत रोशन व मयूर हे ड्रग्जसदृश पावडरनिर्मिती करताना आढळले. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन...
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software