‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बनावट नियुक्ती आदेश घेऊन घाटी रुग्णालयात नोकरीसाठी आलेल्या युवकाविरुद्ध बेगमपुरा पोलिसांनी मंगळवारी (१७ मार्च) गुन्हा दाखल केला आहे. हा युवक भांडारपाल पदासाठी आला होता. हे पद पदोन्नतीने भरले जाणारे आहे, मात्र सरळ सेवा भरती आदेश घेऊन तो आल्याने संशय अधिकाऱ्यांना संशय आला अन्‌ त्याचे बिंग फुटले.

सतिश काकाजी कोलते (रा. भालगाव, पो. वडोदबाजार, ता. फुलंब्री) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. घाटी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी महेश रघुनाथराव गावडे (वय ५७, रा. सिडको एन ८) यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १३ मार्चला दुपारी २ च्या सुमारास ते शासकीय कामानिमित्त मुंबईला गेलेले होते. त्यांना घाटीतील कनिष्ठ लिपिक शेख अरबाज यांनी फोनद्वारे कळविले की, सतिश काकाजी कोलते या नावाची व्यक्ती भांडारपाल वर्ग ३ या पदावर रुजू होण्यासाठी आलेली आहे. त्यानंतर शेख अरबाज यांनी सतिश कोलते या व्यक्तीने सादर केलेल्या आदेशाची प्रत व रुजू होण्याचा विनंती अर्ज गावडे यांना व्हॉट्स ॲपवर पाठवला.

गावडे यांनी या आदेशाचे अवलोकन केले असता बनावट असल्याचा संशय आला. कारण नियुक्ती आदेशात नमूद पद हे पदोन्नतीचे होते, सरळसेवेचे नाही. तसेच हे पद भरण्यासाठी कोणतीही जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली नव्हती. गावडे यांनी मुंबईवरून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी नियुक्ती आदेशाबाबतचा इ-मेल व टपाल तपासून पाहिले. त्या आदेशाबाबतचा इ- मेल किंवा टपाल मिळून आले नाही. त्यामुळे गावडे यांनी याबाबत सोमवारी (१६ मार्च) घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना कळवले. डॉ. सुक्रे यांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गावडे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात बनावट नियुक्ती आदेश घेऊन आलेल्या सतिश कोलते याच्याविरुद्ध तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनिषा केदार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!

Latest News

वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले! वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software