- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाज...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिंदे गटाच्या प्रयत्नांना सुरूंग लावत, 'जादूची कांडी' फिरवून भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचेच अविनाश गलांडे (महालगाव गटाचे सदस्य, ता. वैजापूर) आणि उपाध्यक्षपदीही भाजपचेच जितेंद्र जैस्वाल (बाबरा गटाचे सदस्य, ता. फुलंब्री) यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री अतुल सावे यांनी मध्यरात्रीतून खेळलेल्या खेळीमुळे शिंदे गटाचे मनसुबे धुळीस मिळाले. शिंदे गटाला आम्ही पहिल्या अडीच वर्षांसाठी उपाध्यक्षपद आणि नंतरच्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद देण्यास तयार होतो, पण त्यांनी ते मान्य करण्याऐवजी थेट आम्हालाच सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्हीही सत्तेसाठी ‘गणित जुळवले’, असे स्पष्ट मत मंत्री अतुल सावे यांनी या वेळी स्पष्ट केले.

