वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर मंगळवारी (१७ मार्च) भल्या पहाटे साडेपाचला छापा मारला. गोवंशाची हत्या करत असतानाच पोलीस धडकले, दोघांना रंगेहात पकडण्यात आले. १०० किलो गोमांस जप्त केले. कत्तलीसाठी वापरलेले साहित्यही जप्त केले. त्याचवेळी जवळच असलेल्या गंगापूर जहाँगीर शिवारातही ३ गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे कळताच पोलिसांनी तिथेही धाव घेतली. ही जनावरे वाचविण्यात यश आले.

शेख अख्तर शेख फकीर (वय ४८), शेख जुबेर शेख युनूस (वय ३५, दोघे रा. कुरेशी मोहल्ला, वरूडकाजी, ता. छत्रपती संभाजीनगर) अशी गोमांस कापताना ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ते कुरेशी मोहल्ल्यातील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध कत्तलखाना चालवत होते. गंगापूर जहाँगीर शिवारातील शेतात कत्तलीसाठी जनावरे बांधून ठेवणाऱ्या शेख फकीर शेख मोहम्मद कालू (वय ३४, रा. वरूडकाजी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पत्र्याच्या शेडमध्ये १ बैल, १ गाय आणि १ गोऱ्हा बांधून ठेवला होता. गोवंशांची सुटका करून गोशाळेत पाठविले आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software