मतदान केंद्रावर दिवसभरातून उमेदवाराला जाता येईल फक्‍त ३ वेळेस!, १०० मीटरच्या अंतरात ‘नो मोबाइल झोन’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख अवघ्या ५ दिवसांवर आल्याने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पोलीस आणि निवडणूक विभागाने तयारीची माहिती दिली. त्यानुसार मतदान केंद्रावर दिवसभरातून फक्त तीन वेळेसच उमेदवाराला जाता येईल आणि ठिकाणी तीन मतदार मतदान करेपर्यंतच थांबता येईल. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरात नो मोबाइल झोन असेल. कुणी मोबाइल वापरताना दिसले तर मोबाइल जप्त केला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.

स्मार्ट सिटी कार्यालयात शुक्रवारी (९ जानेवारी) दुपारी पोलीस प्रशासन व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, निवडणूक विभागप्रमुख विकास नवाळे यांच्यासह पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जी. श्रीकांत यांनी बैठकीत सांगितले, की मतमोजणी केंद्रांवर जागेची मर्यादा असल्याने नोंदणीकृत राजकीय पक्षाने प्रत्येक पॅनलसाठी एकच प्रतिनिधी नियुक्त करणे योग्य राहील. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले की, ज्या उमेदवारांना रॅली, सभा किंवा अन्य कार्यक्रमांच्या वेळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असेल त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल.

एअर बलून किंवा ड्रोनचा वापर पोलीस परवानगीशिवाय करू नये, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन कार्यक्रमाच्या स्थळी कोणत्याही उमेदवाराचा किंवा राजकीय पक्षाचा प्रचार, भेटवस्तूंचे आदान प्रदान, राजकीय बॅनर्स लावण्यास बंदी असेल, असेही बजावण्यात आले. निवडणूक रिंगणात ८५९ उमेदवार आहेत. सध्या राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर मतदारांना लालूच देण्यासाठी घरोघरी जाऊन भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. याकडे निवडणूक विभागाने दुर्लक्ष दिसून येत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software